AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ग्रँड फिनालेपूर्वी ‘बिग बॉस मराठी 5’च्या घरातून पंढरीनाथ कांबळे बाहेर

'बिग बॉस मराठी'चा ग्रँड फिनाले जवळ आला आहे. ग्रँड फिनालेपूर्वी या घरातून आणखी एक सदस्य बाहेर पडला आहे. पंढरीनाथ कांबळेला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावं लागलंय. अंकिता आणि पॅडी या दोन सदस्यांमध्ये शेवटी चुरस रंगली होती.

ग्रँड फिनालेपूर्वी 'बिग बॉस मराठी 5'च्या घरातून पंढरीनाथ कांबळे बाहेर
पंढरीनाथ कांबळेImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 30, 2024 | 8:36 AM
Share

पंढरीनाथ कांबळे ऊर्फ पॅडी कांबळे मराठी मनोरंजनसृष्टीतील एक विनोदी अभिनेता आहे. हास्यसम्राट पंढरीनाथ कांबळेने मालिका, नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचं काम केलं आहे. वेगवेगळ्या भूमिका साकारणारा पंढरीनाथ घराघरात लोकप्रिय आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात देखील त्याच्या खेळीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सर्वच सदस्य या आठवड्यात नॉमिनेट होते. त्यामुळे निक्की, सूरज या सदस्यांना रविवारच्या भागात सेफ (सुरक्षित) करण्यात आलं. ‘बिग बॉस मराठी’चा खेळ अंतिम टप्प्यात आलेला असताना या आठवड्यात घरातून कोण बाहेर पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अंकिता आणि पॅडी या दोन सदस्यांमध्ये शेवटी चुरस रंगली. यापैकी अंकिताला ‘बिग बॉस’ने सेफ केलं. तर प्रेक्षकांनी दिलेल्या मतांचा मान ठेवत पंढरीनाथ कांबळेला या आठवड्यात घराचा निरोप घ्यावा लागला.

‘बिग बॉस मराठी’च्या घराचा निरोप घेत पंढरीनाथ कांबळे म्हणाला, “बिग बॉस मराठी’च्या घरातील माझ्या प्रवासाबद्दल मी खूप आनंदी आहे. आता मी बाहेर पडलो याबद्दल मला अजिबात वाईट वाटत नाही आहे. मी कोणाला दुखावलं नाही, कोणाला उलट उत्तर दिलेलं नाही. प्रत्येक वेळेत मी माझे मुद्दे व्यवस्थित मांडले आहेत. घरातील प्रत्येकाचा मी आदर केला आहे. त्यामुळे आज निरोप घेताना मला अजिबातच दु:ख होत नाही.”

“बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेपर्यंत जायची माझी इच्छा होती. घरात असताना मी माझ्या पत्नीला खूप मिस केलं. पण आता बाहेर पडल्यानंतर मला सूरजची नक्कीच आठवण येईल. डीपी, अंकिताचीदेखील आठवण येईल. त्यांच्याबद्दल एक आत्मियता निर्माण झाली आहे. हे सर्व त्यांच्या मतांवर ठाम आहेत. मतांवर ठाम राहायला मला ‘बिग बॉस मराठी’च्या घराने शिकवलं”, असंही तो पुढे म्हणाला.

पंढरीनाथच्या एक्झिटवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘कुणाकुणाला वाटतं हे चुकीचं झालं. पॅडी दादा खूप छान खेळतात’, असं एकाने लिहिलं. तर ‘पॅडी दादा खूप छान गेम खेळले. सूरजला वेळोवेळी समजावून सांगणारे फक्त तुम्हीच होते. सूरजला तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळालं’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.