AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंढरीनाथ कांबळे घरातून बाहेर येताच म्हणाला, निक्की-अरबाजची फालतुगिरी…

बिग बॉस मराठी आता अंतिम टप्प्यात आला आहे. बिग बॉस मराठीच्या शेवटच्या आठवड्याआधी पंढरीनाथ कांबळे घरातून बाहेर झाले आहेत. पण घरातून बाहेर येताच त्यांनी अनेक गोष्टींवर आपले मत मांडले आहे. बिग बॉस मराठीत्या घरात निक्की आणि अरबाज यांच्या नात्यावर देखील त्यांनी भाष्य केले आहे.

पंढरीनाथ कांबळे घरातून बाहेर येताच म्हणाला, निक्की-अरबाजची फालतुगिरी...
| Updated on: Oct 01, 2024 | 4:26 PM
Share

Bigg Boss Marathi : बिग बॉसच्या घरातून बाहेर पडतात पॅडा कांबळे यांनी निक्की आणि अरबाजविषयी प्रतिक्रिया दिली आहे. बिग बॉस मराठीच्या घरातून नुकताच पंढरीनाथ कांबळे हे बाहेप पडले आहेत. पॅडी बाहेर जाताच अनेक जण भावुक झाले. पॅडी कांबळे यांची बिग बॉसच्या घरातील प्रवास ६२ दिवसांचा होता. घराबाहेर आल्यावर पॅडी कांबळे यांनी अनेक गोष्टीवर भाष्य केले आहे. त्यांनी त्यांचा घरातील प्रवास सांगत असताना अनेक खुलासे केले आहेत. त्यांनी अरबाज आणि निक्कीच्या नात्याचा देखील उल्लेख केला. काय म्हणाले पॅडी कांबळे जाणून घेऊयात.

पंढरीनाथ यांना जेव्हा निक्की आणि अरबाज यांच्या घरातील नात्याबाबत विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, ”त्यांच्यात कसली मैत्री… ती तर नुसती फालतुगिरी होती. मित्र आम्ही देखील होतो. मी-योगिता, मी -अंकिता ही मैत्री होती. या दोघांनी शो ऑफ करण्यासाठी अफेअर सुरु केलं होतं. अफेअरचं हे एक लेपन होतं. गुलूगुलू बोलायचे. घरात मैत्री पण, बाहेर जाऊन तुम्ही काय ते अफेअरचं बघा. एका बेडवर झोपायचे. तुमच्यात अशी किती दिवसांची ओळख होती. वर्षभर सुरू असलेल्या अफेअरमध्ये पण लोकं असे वागत नाही असे निक्की आणि अरबाज वागत होते.” अशी प्रतिक्रिया पंढरीनाथ यांनी दिली.

पंढरीनाथ पुढे म्हणाले की,”निक्की-अरबाज यांच्यातील हे नातं फक्त शोसाठी होतं. एक दिखावा सुरु होता. हा दिखावा तेव्हा फाटला जेव्हा निक्कीची आई घरात आली. तिने सत्य परिस्थिती काय आहे ती सांगितली. या सगळ्या गोष्टी निक्कीला तिची आई घरात आल्यावर समजल्या का. त्यानंतर मग ती बदलली का. आता ती अभिजीतबरोबर चांगली बोलतेय”

”अरबाज घराबाहेर गेल्यानंतर तिला आधार हवा होता, जो तिला अभिजीतच्या रुपात मिळाला. ती या घरात फक्त भांडणं आणि वाद करून पुढे जात आहे. पण अभिजीत सावंत खूप हुशारीने हा गेम खेळतोय.”

बिग बॉसच्या शेवटच्या आठवड्याला सुरुवात झालीये. पण निक्की तांबोळीने ग्रँड फिनालेमध्ये एन्ट्री घेतलीये. घरातील उर्वरित सहा सदस्य नॉमिनेट झाले असून यांच्यातील एक जण मिडवीक एलिमिनेशनमध्ये घराचा ( Bigg Boss Marathi ) निरोप घेणार आहे.

जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.