AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Big Boss Marathi : ‘निकी फटकळ पण तेवढीच प्रेमळ, महाराष्ट्राने तिची एकच बाजू बघितली’; घनश्याम दरोडे भरभरून बोलला

बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सुरू आहे. आता पाच आठवडे झाले असून खेळात आणखी रंगत येताना दिसत आहे. शनिवारी पार पडलेल्या भाऊच्या धक्क्यावर नगरचा छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरोडे हा बाहेर पडला. घरातून बाहेर आल्यावर घनश्यान दरोडेा याने बिग बॉस घरातील स्पर्धेक निकी तांबोळीबद्दल भरभरून बोलताना दिसला.

Big Boss Marathi : 'निकी फटकळ पण तेवढीच प्रेमळ, महाराष्ट्राने तिची एकच बाजू बघितली'; घनश्याम दरोडे भरभरून बोलला
| Updated on: Sep 09, 2024 | 10:54 PM
Share

बिग बॉसच्या घरातून महाराष्ट्रातील नगरकचा छोटा पुढारी म्हणून ओळखला जाणारा घनश्यान दरोडे घराबाहेर झाला आहे. घरातील सर्वात भांडखोर असणाऱ्या निकीच्या ग्रुपमध्ये घनश्याम खेळत होता. त्यावेळी निकी तांबोळी आणि घनश्याम चा एका संवादाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यासोबतच निकी कायम बाईsss काय हा प्रकार असं बोलते या शब्दांवर दहीहंडीला गाणीही वाजलीत. निकी तांबोळी घरामध्ये उर्मटपणाने वागणं इतर सदस्यांचा अपमान करण्यामुळे तिची प्रतिमा डळमळीत झाली आहे. मात्र घराबाहेर आल्यावर घनश्याम दरोडो याने तिच्याबद्दल भरभरून बोलला.

बाई हा काय प्रकार हा खूप गाजला, जेवलीस का, प्रेम भेटलं, यावर टीका होतात पण माझं आणि निकीचं नातं बहिण-भावासारखा पवित्र आहे. निकी फटकळ आहे पण तेवढीच प्रेमळ पण आहे. निकी हळव्या मनाची असून महाराष्ट्राने तिची एकच बाजू बघितली आहे. घरातली भांडी घासत नाही. पण महाराष्ट्राने निकीची दुसरी बाजू पाहिली नाही. निकीने प्रत्येक वेळी माझीच काळजी घेतली आहे. मला एकच गोष्टीचा दुःख आहे मराठी प्रेक्षकांच्या मनात जागा करायला कमी पडलो, असं घनश्याम दरोडे म्हणाला.

मी घरात कधी राजकारण केलं नाही, घर घरासारखं चालवायचं होत. मी कधीही चुगली केली नाही. सुरज मला नॉमिनेट का करत होता मी त्याला कधी विचारलं नाही. सुरज माझ्या मोठा भावा सारखा आहे. ज्यावेळेस घराच्या बाहेर जाणार तेव्हाच ठरवलं होतं की माझे पॉईंट सुरजला देणार. माझ्या शब्द पाळत असतो काळा दगडावरची पांढरी रेग. घरातले लोक मला सुरजला नॉमिनेट करायला सांगत होते. सुरज गरिबीतून वर आलाय त्याला सपोर्ट केला पाहिजे. मी सुरजच्या विरोधात जाऊन कॅप्टन करू शकत नाही. माझी पहिली पसंत सुरज चव्हाणच होता. महाराष्ट्राने सुरज चव्हाण च्या पाठीशी राहायला पाहिजे मराठी माणसाला मोठा करा, असंही घनश्याम दरोडे म्हणाला.

बिग बॉस मराठीमध्ये वाईल्ड कार्डने बॉडीबिल्डर संग्राम चौगुले याने एन्ट्री मारली आहे. आता खेळात आणखी रंगत येणार आहे. बिग बॉस घरात आता सर्वच तगडे स्पर्धक आहेत. संग्रामच्या येण्याने आता अरबाजला एक टक्कर देणारा रांगडा गडी घरात आला आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.