सना मकबूल हिची उडाली झोप, अभिनेत्रीचा मोठा खुलासा, बिग बॉस ओटीटी…
काही दिवसांपूर्वीच बिग बॉस ओटीटी 3 चा फिनाले झालाय. सना मकबूल ही विजेता झालीये. विशेष म्हणजे यंदाच्या सीजनने मोठा धमाका केलाय. हे सीजन टॉप राहिले आहे. अरमान मलिक हे या सीजनमधील सर्वाधिक चर्चेत राहिलेले एक नाव आहे. आता नुकताच सना मकबूल हिने मोठा खुलासा केलाय.

बिग बॉस ओटीटी 3 चा फिनाले होऊन आता काही दिवस झाले आहेत. मात्र, बिग बॉस ओटीटी 3 ची अजूनही तूफान चर्चा रंगताना दिसत आहे. सना मकबूल ही बिग बॉस ओटीटी 3 ची विजेता झालीये. मात्र, सना विजेता झाल्यानंतर सर्वचजण हैराण झाल्याचे बघायला मिळाले. त्याचे कारणही तेवढेच मोठे आहे. बिग बॉसच्या घरात सना खास गेम खेळताना दिसली नाही. अनेकांनी सना मकबूल ही बिग बॉसची विजेता झाल्यानंतर संताप व्यक्त केला होता. हेच नाही तर बिग बॉसच्या घरात सहभागी झालेल्या लोकांना देखील सना मकबूल ही विजेता झालेले अजिबात पटले नाही. सर्वांनाच वाटत होते की, रणवीर शाैरी हे बिग बॉस ओटीटी 3 चे विजेता होतील. प्रत्यक्षात उलटे झाले.
आता नुकताच बिग बॉस ओटीटी 3 ची विजेता झाल्यानंतर सना मकबूल हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना सना मकबूल ही दिसत आहे. सना मकबूल ही म्हणाली की, मी बिग बॉसच्या घरातून बाहेर आलीये. मात्र, मला अजिबात झोप येत नाहीये. मला माझ्या कुटुंबियांनी आराम करण्याचा सल्ला दिलाय.
मी ज्यावेळी बिग बॉसच्या घरात जात होते, त्यावेळी मी ठरवले होते की, बाहेर आल्यानंतर मी घरातील व्हिडीओ पाहणार नाहीये. मात्र, ज्यावेळी मला थोडासा वेळ मिळतो, त्यावेळी मी रात्री व्हिडीओ पाहते. त्यावरून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात. मुळात म्हणजे मला काही गोष्टींचा अजिबाच फरक पडत नाही.
बिग बॉसच्या घरातील लोक माझ्याबद्दल काय बोलतात किंवा त्यांचे विचार माझ्याबद्दल नेमके काय आहेत काहीच फरक मला पडत नाही. कारण मला बाहेरच्या लोकांनी खूप जास्त प्रेम दिले आहे. सना मकबूल हिने स्पष्ट केले की, बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यापासून तिला रात्री अजिबातच झोप येत नाही.
सना मकबूल हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सनाचा चाहतावर्ग मोठा आहे. सना मकबूल ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. सना मकबूल आणि रणवीर शाैरी यांच्यामध्ये बिग बॉसच्या घरात जोरदार वाद होताना देखील दिसला.