प्रणित मोरे सापडला सलमान खानच्या कचाट्यात, दबंग खानबद्दल बोलणे पडले महागात, व्हिडीओ व्हायरल
Bigg Boss 19 : बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा बिग बॉस सीजन 19 ला होस्ट करत आहे. या सीजनला धमाक्यात सुरूवात झालीये. विशेष म्हणजे आता सलमान खान हा विकेंडच्या वारमध्ये प्रणित मोरे याचा जोरदार क्लास घेताना दिसत आहे.

बिग बॉस 19 ला धमाक्यात सुरूवात झालीये. सलमान खान हाच 19 व्या सीजनला होस्ट करतोय. विशेष म्हणजे बिग बॉसच्या सीजनला सुरूवात होऊ काही दिवस झाली नाहीत, तोवरच बिग बॉसच्या घरात मोठे राडे सध्या बघायला मिळत आहेत. प्रेक्षकांना आतुरता असते ती म्हणजे विकेंडच्या वारची. विकेंडच्या वारमध्ये सलमान खान हा घरातील सदस्यांचा चांगलाच क्लास लावताना दिसतो. नुकताच विकेंडच्या वारमध्ये सलमान खान संतापल्याचे बघायला मिळाले. सलमान हा थेट घरातील सदस्य प्रणित मोरे याचा क्लास लावताना दिसतोय. प्रणित मोरेवर सलमान खान हा चांगलाच चिडला आहे.
सलमान खान हा बिग बॉसच्या घरातील वागण्यामुळे नाही तर त्याच्यावर मारलेल्या जोकमुळे प्रणितवर चिडला. सलमान खान प्रणितला म्हणाला की, मला माहिती आहे तू माझ्यावर काय काय जोक केले आहेत. तू माझ्याबद्दल काय काय बोलतो हे मला माहिती आहे. तू जे जोक्स माझ्यावर मारतो…जर तू माझ्या जागी असता आणि मी तुझ्या जागी घरात असतो तर तू काय केले असते?
तुला लोकांना हसवायचे होते…तू माझ्या नाव घेऊन ते केले…मला स्पष्ट वाटते की, तू इतके जास्त खाली जायला नको होते. सलमान खान प्रणित मोरेचा क्लास लावतानाचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. यावरून हे दिसत आहे की, विकेंडच्या वारमध्ये प्रणित मोरेचा सलमान खानने चांगलाच बॅंड वाजवला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत एकाने म्हटले की, भाई तू तर गेलास…दुसऱ्याने म्हटले, तुला याचसाठी बिग बॉस 19 च्या घरता आणले आहे.
Iss season ka pehla Weekend Ka Vaar hoga kamaal, jab Salman uthayenge Pranit ke jokes par sawaal! 👁
Dekhiye #BiggBoss19, Mon-Sun raat 9 baje @JioHotstar aur 10:30 baje @ColorsTV par.#Vaseline #AppyFizz @danubeprop @CitroenIndia#BB #BiggBoss #BB19 #BiggBoss19… pic.twitter.com/WL4jZxXelT
— Bigg Boss (@BiggBoss) August 30, 2025
प्रणित मोरे याचा गेम सध्या प्रेक्षकांना आवडताना दिसतोय. मराठी चेहरा म्हणून प्रणित मोरे याला बिग बॉसच्या घरात आणण्यात आले. मात्र, सलमान खान हा त्याच्यावर जोक्स मारल्यावरून त्याला सुनावताना दिसला. प्रणित मोरे याने फक्त सलमान खान याच्यावरच नाही तर अजून काही कलाकारांवर जोक्स मारले आहेत. सलमान खान याने त्याच्या मनात असलेली प्रणितवरची भडास थेट काढली आहे.
