Sushant Death Case | क्वारंटाईनमधून सुटका, पाटण्याचे एसपी विनय तिवारी बिहारला परतणार

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पाटणा शहराचे पोलिस अधीक्षक विनय तिवारी आणि चार अधिकारी दोन ऑगस्टला रात्री मुंबईला आले होते

Sushant Death Case | क्वारंटाईनमधून सुटका, पाटण्याचे एसपी विनय तिवारी बिहारला परतणार

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आलेले पाटण्याचे एसपी विनय तिवारी बिहारला परत जाणार आहेत. मुंबई महापालिकेने त्यांना क्वारंटाईन संपवण्याची मुभा दिली आहे. तिवारींना बळजबरीने होम क्वारंटाईन केल्याचा आरोप बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी केल्यानंतर वाद निर्माण झाला होता. (Bihar IPS officer Vinay Tiwari who was quarantined in Mumbai to leave for Patna)

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पाटणा शहराचे पोलिस अधीक्षक विनय तिवारी आणि चार अधिकारी दोन ऑगस्टला रात्री मुंबईला आले होते. त्यानंतर मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी विनय तिवारी यांना 14 दिवसांसाठी होम क्वारंटाईन केले.

“बीएमसीने एसएमएसद्वारे मला कळवले आहे की मी होम क्वारंटाईन सोडून जाऊ शकतो. मी आता पाटण्याला रवाना होणार आहे” असे विनय तिवारी यांनी ‘एएनआय’ला सांगितले.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आला आहे. त्यामुळे बिहार पोलिसांनी विनय तिवारी यांना परतण्याचे आदेश दिल्याची शक्यता आहे. तिवारींसह आलेले चार पोलीस अधिकारी कालच पाटण्याला परतले, तर तिवारी आज निघणार आहेत.

काय आहे प्रकरण?

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईला आलेल्या बिहारच्या एसपींना बळजबरीने क्वारंटाईन केल्याचा आरोप झाला. पाटणा शहराचे पोलिस अधीक्षक विनय तिवारी यांनी बीएमसीने जाणूनबुजून क्वारंटाईन केल्याचा आरोप बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी व्हिडीओ ट्वीटद्वारे केला.

“विनय तिवारी यांनी विनंती करुनही त्यांची आयपीएस मेसमध्ये व्यवस्था करण्यात आली नाही. ते गोरेगावच्या गेस्ट हाऊसमध्ये राहत आहेत” असेही पांडे यांनी फेसबुकवर सांगितले. विनय तिवारी यांच्या हातावर मुंबई महापालिकेने मारलेल्या होम क्वारंटाईनच्या शिक्क्यात 15 ऑगस्ट ही तारीख दिसत होती.

देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या व्यक्तींसाठी नियमावली ठरवण्यात आली आहे, त्यानुसार पाटणा शहराचे पोलिस अधीक्षक विनय तिवारी यांना होम क्वारंटाईन करण्यात आले, असे स्पष्टीकरण मुंबई महापालिकेने दिले होते.

(Bihar IPS officer Vinay Tiwari who was quarantined in Mumbai to leave for Patna)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *