AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्टेज शोला जात असताना डिव्हायडरवर कार आदळली, प्रसिद्ध गायकाचा मृत्यू; कोण होते छोटू पांडे ?

बिहारमधील कैमूरमध्ये रविवारी रात्री एक भीषण अपघात झाला. त्या अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू झाला, त्यामध्ये एका उदयोन्मुख गायक- अभिनेत्याचाही समावेश आहे. छोटू पांडे असे त्याचे नाव असून, या अपघातात तो मृत्यूमुखी पडला.मोहनिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवकाली गावाजवळ दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात स्कॉर्पिओ गाडी दुभाजकावर आदळली आणि हा भीषण अपघात झाला.

स्टेज शोला जात असताना डिव्हायडरवर कार आदळली, प्रसिद्ध गायकाचा मृत्यू; कोण होते छोटू पांडे ?
| Updated on: Feb 27, 2024 | 11:01 AM
Share

पाटणा | 27 फेब्रुवारी 2024 : बिहारमधील कैमूरमध्ये रविवारी रात्री एक भीषण अपघात झाला. त्या अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू झाला, त्यामध्ये एका भोजपुरी गायक- अभिनेत्याचाही समावेश आहे. छोटू पांडे असे त्याचे नाव असून, या अपघातात तो मृत्यूमुखी पडला. मोहनिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवकाली गावाजवळ हा अपघात झाला. एका बाईकस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात स्कॉर्पिओ गाडी दुभाजकावर आदळली आणि हा भीषण अपघात झाला. मृतांमध्ये अभिनेता-गायक छोटू पांडे याच्यासह बिहारच्या बक्सर येथील 6 जणांचाही समावेश आहे.

प्रकाश राय, अनु पांडे, सत्य प्रकाश मिश्रा, बजेश पांडे, आणि शशि पांडे यांचाही मृतांमध्ये समवेश आहे. अपघातानंतर संपूर्ण टीम गाडीतून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होती, मात्र तेव्हाच मागून येणाऱ्या ट्रकने त्यांना चिरडलं.  या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मोठ्या कष्टांनी मृतदेह गाडीतून बाहेर काढले.

एवढंच नव्हे तर कानपूर येथील रहिवासी सिमरन श्रीवास्तव आणि मुंबईतील आंचल यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. हे सर्वजण छोटू पांडेसोबत काम करणारे कलाकार होते आणि छोटू पांडेसोबत चंदौली येथे एक कार्यक्रम करणार होते. त्या स्टेज शोसाठी जात असतानाच तेथे पोहोचण्यापूर्वीच त्यांचा अपघात झाला. अपघाताच्या या बातमीमुळे संपूर्ण भोजपुरी इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.

कोण होते छोटू पांडे ?

उदयोन्मुख गायक -कलाकार छोटू पांडे हे बक्सर जिल्ह्यातील घेवरिया गावचे रहिवासी होते. त्यांचे वडील शंकर पांडे हे पुरोहित असून, छोटू यांना चार भाऊ आहेत. उदयोन्मुख कलाकार असणाऱ्या छोटू पांडे यांना गाण्याची प्रेरणा त्यांचे आजोबा, विजय सागर पांडे यांच्याकडून मिळाली. तेही त्यांच्या काळातील नामवंत कलाकार होते. या अपघातानंतर छोटू पांडे यांच्या गावात शोककळा पसरली असून त्यांचे घरदार दु:खात बुडालं आहे.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.