‘तांडव’ला भाजपचा विरोध, हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप

| Updated on: Jan 17, 2021 | 12:23 PM

तांडव वेबसिरीज ही एक पॉलिटिकल ड्रामा आहे. ही वेबसिरीज काहींच्या चांगलीच पसंतीला उतरत आहे. तर काहींच्या मते या वेबसिरीजद्वारे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

तांडवला भाजपचा विरोध, हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप
Follow us on

मुंबई : बहुचर्चित तांडव वेबसिरीजला भाजपनं विरोध दर्शवला आहे. भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी आक्षेप घेतला आहे. या वेबसिरीजमध्ये हिंदू विरोधी कंटेंट असल्याचा आणि हिंदू देवदेवतांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे तांडव वेबसिरीज बॅन करण्याची मागणी आता करण्यात येत आहे. मनोज कोटक यांनी सूचना आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना तसं पत्र लिहिलं आहे. त्याचबरोबर वेबसिरीजच्या निर्मात्याने माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.(BJP demands ban on Tandav web series, allegations of hurting Hindu sentiments)

तांडव वेबसिरीज ही एक पॉलिटिकल ड्रामा आहे. ही वेबसिरीज काहींच्या चांगलीच पसंतीला उतरत आहे. तर काहींच्या मते या वेबसिरीजद्वारे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. मोहम्म जिशान आयुब याच्यावर चित्रित एका दृश्यावरुन हा वाद रंगला आहे. या दृश्यामुळे हिंदू देवदेवतांचा अपमान झाला असल्याचा आरोप करत निर्मात्यांनी लोकांच्या भावना दुखावल्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी सोशल मीडियातून होत आहे. त्याचबरोबर या वेबसिरीजविरोधात हॅशटॅग मोहीमही राबवली जात आहे. ही वेबसिरीज अली अब्बास जाफरने दिग्दर्शित केली असून, यात सैफ अली खान, डिंपल कपाडिया, सुनील ग्रोव्हर मुख्य भूमिकेत आहेत.

निर्मात्याने माफी मागावी – कोटक

भाजप आमदार मनोज कोटक यांनीही या वेबसिरीजला विरोध दर्शवला आहे. वेबसिरिजमध्ये हिंदू देवदेवतांचा अपमान करण्यात आला असून, त्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या जात आहेत. त्यामुळे या वेबसिरीजवर बंदी घालण्यात यावी आणि वेबसिरीजच्या निर्मात्याने माफी मागावी अशी मागणी कोटक यांनी केली आहे. तसं पत्रच त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी लिहिलं आहे. त्यामुळे आता जावडेकर या वेबसिरीजबाबत काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

‘तांडव’मधील महत्वाचे चेहरे

या वेब सीरीजमध्ये डिंपल कपाडिया, दिनो मोरिया, तिग्मांशू धुलिया, गौहर खान, मोहम्मद झीशान, कृतिका कामरा, सुनील ग्रोहर, अनूप जोशी, कुमुद मिश्रा हे महत्वपूर्ण भूमिकेत आहेत. तांडव वेब सीरीज 15 जानेवारीला अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाली आहे.

संबंधित बातम्या : 

Special Story | वेब सीरीज विश्वातील अंधाऱ्या वाटा, मनोरंजनाच्या नावे केवळ अश्लीलता?

Tandav Trailer Out : सत्ता, राजकारण आणि षडयंत्र, सैफच्या ‘तांडव’चे ट्रेलर लॉन्च!

BJP demands ban on Tandav web series, allegations of hurting Hindu sentiments