अभिनेता नागार्जुनच्या फार्महाऊसवर मृतदेह आढळल्याने खळबळ

दाक्षिणात्य अभिनेता अक्किनेनी नागार्जुनच्या तेलंगणातील फार्महाऊसवर एका व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. संबंधित व्यक्तीचा सहा महिन्यांपूर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज आहे

Body found in Nagarjuna’s farmland, अभिनेता नागार्जुनच्या फार्महाऊसवर मृतदेह आढळल्याने खळबळ

हैदराबाद : प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता अक्किनेनी नागार्जुनच्या फार्महाऊसवर एका व्यक्तीचा मृतदेह (Body found in Nagarjuna’s farmland) आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तेलंगणातील महबूबनगर जिल्ह्यातील पापिरेड्डीगुडा गावात नागार्जुनच्या मालकीची मालमत्ता आहे. तिथल्या फार्महाऊसशेजारील एका बंदिस्त खोलीत पुरुषाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला.

पापिरेड्डीगुडा गावात असलेल्या फार्महाऊसमधील शेतजमिनीवर मृतदेह सापडल्याचं वृत्त (Body found in Nagarjuna’s farmland) बुधवारी रात्री वाऱ्यासारखं पसरलं. या मानवी सांगाड्याच्या अंगावर फुल स्लीव्ह्ज शर्ट आणि पँट आढळल्याने तो एखाद्या अधिकाऱ्याचा असावा, असा कयास आहे.

नागार्जुनचं फार्महाऊस तब्बल 40 एकर परिसरावर पसरलेलं आहे. या ठिकाणी त्याची फारशी ये-जा नसते. मात्र सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात त्याची पत्नी अक्किनेनी अमला आली होती. जैविक शेती करण्यासाठी अमलाने काही मजुरांना बोलावून घेतलं.

मुंबई मेट्रो बांधकामाचा दगड कारवर कोसळला, अभिनेत्री मौनी रॉय थोडक्यात बचावली

फार्महाऊसवर बुधवारी सकाळी शेतीचं काम करताना काही मजुरांना दुर्गंधी जाणवली. त्यांनी दुर्गंधीचा माग काढत एक बंदिस्त खोली उघडून पाहिली असता, मजुरांना एक मृतदेह कुजलेल्या अवस्थेत (Body found in Nagarjuna’s farmland) आढळला. ते पाहून मजुरांचा चांगलाच थरकाप उडाला आणि त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

संबंधित व्यक्तीचा मृत्यू सहा महिन्यांपूर्वी झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी बांधला आहे. केशमपेट पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरु केला आहे. हा मृतदेह नेमका कोणाचा असेल, याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी नजीकच्या काळात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झालेल्या व्यक्तींची यादी मागवली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *