आमिर खानच्या मुलाने केलंय लग्न? सीक्रेट मॅरिजवर जुनैदचं लक्षवेधी उत्तर
बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनैद खानचा दुसरा चित्रपट 'लवयापा' लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच एका मुलाखतीत त्याला विचारण्यात आलं की, त्यानेही वडील आमिल खान प्रमाणे गुपचूप लग्न केलं आहे का? यावर जुनैदने हसत उत्तर दिलं.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजे अभिनेता आमिर खान याने अभिनय विश्वात पदार्पण केल्यानंतर ‘कयामत से कयामत तक’ हा पहिला ब्लॉकबास्टर सिनेमा दिला. त्यानंतर अभिनेत्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही. सांगायचं झालं तर, सिनेमा प्रदर्शित होण्याच्या 2 वर्षांपूर्वी आमिर खान याने लग्न केलं. पण लग्न झाल्याची अधिकृत घोषणा अभिनेत्याने केली नव्हती. आता अभिनेत्याचा मुलगा जुनैद याने देखील मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं आहे. त्यामुळे जुनैद याला देखील खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. वडिलांप्रमाणे तू देखील गुपचूप लग्न केलं तर नाही ना? यावर जुनैद याने हसत उत्तर दिलं.
नुकताच झालेल्या मुलाखतीत जुनैदला विचारण्यात आलं की, ‘कोणी तरी मला सांगितलं आहे की, जुनैद याचं देखील गुपचूप लग्न झालं आहे आणि तो लग्न सर्वांपासून लपवत आहे?’ यावर जुनैदने विनोदी अंदाजात उत्तर दिलं. ‘नाही… खरं तर त्यांना (आमिर खान) देखील लग्न कधीच लपवाचं नव्हतं. पण निर्मात्यांनी सांगितलं होतं की सिनेमा प्रदर्शित होईपर्यंत शांत राहा…’
पुढे अभिनेत्याला विचारण्यात आलं की, तुझं देखील गुपचूप लग्न झालं नाही ना? यावर जुनैद म्हणाला, ‘नाही…जेव्हा लग्न होईल तेव्हा नक्की सर्वांना सांगेल.’ सध्या सर्वत्र जुनैदच्या आगामी सिनेमाची चर्चा रंगली आहे. आमिर खानचा मुलगा जुनैद खान आणि बोनी कपूरची लहान मुलगी खुशी कपूर या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. दोघेही पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत.खुशी आणि जुनैद ‘लवयापा’ चित्रपटाच्या माध्यमातूम बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत.
आमिर खानचं गुपचूप लग्न?
1973 मध्ये ‘यादों की बारात’ सिनेमातून आमिर खान बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर 1984 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘होली’ सिनेमातून अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमा फ्लॉप ठरला. 1988 साली प्रदर्शित झालेल्या ‘कयामत से कयामत तक’ सिनेमातून अभिनेत्याला प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली.
‘कयामत से कयामत तक’ सिनेमा प्रदर्शित होण्याच्या 2 वर्षांपूर्वी म्हणजे 1986 मध्ये आमिर खान आणि रीना यांचं लग्न झालं होतं. आमिर खान आणि रीना यांना एक मुलगा जुनैद खान आणि मुलगी आयरा खान आहे. दोन मुलांच्या जन्मानंतर आमिर आणि रीना यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पहि्ल्या घटस्फोटानंतर आमिर खान याने दुसरं लग्न किरण राव हिच्यासोबत केलं. पण दोघांचं नातं देखील फार काळ टिकलं नाही.
जुनैद खान याचे सिनेमे
जुनैद खान याने ‘महाराज’ सिनेमातून अभिनय विश्वात पदार्पण केलं. ‘महाराज’ सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. आता जुनैदचा पहिलाच सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. 7 फेब्रुवारी रोजी सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
