ऐश्वर्या राय हिच्याबद्दल अभिषेक बच्चन याचा अत्यंत मोठा खुलासा, थेट म्हणाला, कधीच..
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. अभिनेत्रीचे चित्रपट कायमच धमाका करताना दिसतात. अभिषेक बच्चन याने लग्नानंतर पहिल्यांदाच खासगी आयुष्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे तूफान चर्चेत आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या यांच्या नात्याबद्दल विविध चर्चा रंगताना दिसल्या. मात्र, यावर आता अभिषेक बच्चन स्पष्टपणे बोलताना दिसत आहे. ऐश्वर्या राय हिच्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर स्पष्टपणे अभिषेकने भूमिका घेतली. नक्की काय सुरू आहे हे देखील त्याने सांगितले. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची एक मुलगी असून ऐश्वर्या जास्तीत जास्त वेळ आराध्याला देण्याचा प्रयत्न करते. प्रत्येक कार्यक्रमात आपल्या लेकीला घेऊन ऐश्वर्या पोहचते. यादरम्यान ती कधीच आराध्या हिचा हातही सोडत नाही. आराध्या सोशल मीडियावर अजिबात सक्रिय नसल्याने अभिषेक बच्चन याने सांगितले. हेच नाही तिच्याकडे स्वत:चा फोन देखील नाही. तिच्या मित्र मैत्रिणींना तिला बोलायचे असेल तर ऐश्वर्याच्या फोनवर कॉल करतात.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचे लग्न 2007 मध्ये झाले. हे लग्न त्यावेळीची सर्वात जास्त चर्चेत असणारे लग्न होते. 2011 मध्ये ऐश्वर्याने मुलगी आराध्या बच्चन हिला जन्म दिला. मात्र, आराध्याच्या जन्मानंतर ती फार काही चित्रपटांमध्ये दिसली नाही. फक्त निवडक चित्रपटांमध्ये आराध्या दिसली. आराध्यच्या जन्मानंतर अभिनेत्रीने 6 चित्रपट केली. लग्न झाल्यानंतर ऐश्वर्याची फॅन फॉलोइंग कमी झाल्याचे सांगितले जाते.
यावर आता स्पष्टपणे बोलताना अभिषेक बच्चन दिसला. अभिषेक बच्चन म्हणाला की, मला अजिबात वाटत नाही की, लग्नानंतर किंवा आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्याचा चाहतावर्ग कमी झाला. आमचे लग्नानंतरचे आयुष्य एकदम आनंदी आहे. आमच्या लग्नाला 18 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि मी कधीच त्यांच्या फॅन फॉलोइंगमध्ये कमी झाल्याचे बघितले नाही. सर्वात पहिले माझ्या डोक्यात जे उदाहरण येते ते म्हणजे ऐश्वर्या आहे.
यासोबतच हेमा मालिनी या देखील अशा अभिनेत्री आहेत, ज्यांनी लग्नानंतरही अनेक हीट चित्रपट दिली आहेत. अभिषेक बच्चन याने मान्य केले की, लग्नानंतर त्याच्या आयुष्यात काही बदल नक्कीच झाली आहेत. आता तो एक वडील असून कुटुंबाबद्दल त्याच्य जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते. पहिल्यांदाच आपल्या नात्याबद्द जाहीरपणे बोलताना अभिषेक बच्चन दिसला.
