ऐश्वर्या राय हिच्यासोबतच्या घटस्फोटाबद्दल अभिषेक बच्चन याचा अत्यंत मोठा खुलासा, थेट म्हणाला, तिला..
Abhishek Bachchan on Divorce : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल विविध चर्चा रंगताना दिसल्या. मात्र, यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य केले नाही. शेवटी आता अभिषेक बच्चन याने मोठा खुलासा केला.

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल विविध चर्चा रंगताना दिसल्या. मात्र, या चर्चांवर अभिषेक बच्चन किंवा ऐश्वर्याने अजिबातच भाष्य केले नाही. मध्यंतरी सांगितले जात होते की, ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे. अनेकदा ऐश्वर्या राय मुलगी आराध्या बच्चन हिच्यासोबत विमानतळावर स्पॉट झाली. बच्चन कुटुंबातील कोणत्याही सदस्यासोबत ऐश्वर्या दिसत नाही. यामुळेच दावा केला जात होता की, ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबातील वाद टोकाला पोहोचला. अनंत अंबानीच्या लग्नातही ऐश्वर्या राय बच्चन कुटुंबासोबत पोहोचली नव्हती ती मुलीसोबतच वेगळी आली होती. मात्र, त्यावेळी बच्चन कुटुंबियांनीही घटस्फोटाच्या चर्चांवर भाष्य केले नाही. आता अभिषेक बच्चन याने ऐश्वर्या राय हिच्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर पहिल्यांदाच भाष्य केले.
अभिषेक बच्चन याने नुकताच पीपिंग मूनला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अभिषेकला विचारण्यात आले की, सध्या तुमच्या आणि ऐश्वर्या रायच्या नात्याबद्दल ज्याकाही अफवा सुरू आहेत, त्याबद्दल तुमची मुलगी आराध्या हिला काही कल्पना आहे? यावर अभिषेक बच्चन याने म्हटले अजिबात नाही. मला जिथपर्यंत माहिती आहे तिथपर्यंत तिला याबद्दल काहीच कल्पना नाहीये.
यासोबतच त्याने ऐश्वर्या राय हिच्यासोबतच्या घटस्फोटाबद्दल बोलताना म्हटले ही बकवास आहे, घटिका आणि चुकीचे आहे. कित्येक दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाबद्दल चर्चा सुरू होती. आता पहिल्यांदाच त्यावर अभिषेक बच्चन याने भाष्य केले. अभिषेक म्हणाला की, माझी मुलगी आराध्या 14 वर्षाची आहे आणि तिला याबद्दल काहीच माहिती नाही.
तिच्याकडे स्वत:चा फोन देखील नाही. ती खूप जास्त समजदार आहे. खूप छान आहे. आराध्याच्या आईने तिला खूप जास्त चांगले संस्कार दिले आहेत. जर आराध्याच्या मित्रांना तिला फोन करायचा असतील तर ते तिच्या आईच्या फोनवर करतात. तिला तिचा अभ्यास करायला आणि शाळेत जायला आवडते. मला वाटत नाही की, ती आमची नावे गुगलवर सर्च करत असावी. पहिल्याच अभिषेकने सर्व गोष्टींवर थेट भाष्य केले. काही दिवसांपूर्वीच आराध्या बच्चन हिचा वाढदिवस होता. नातीच्या वाढदिवसाच्या दिवशी बिग बींनी खास पोस्ट शेअर केली होती.
