AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अयोध्येत 14 कोटींची जमीन खरेदी केल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी महाराष्ट्राच्या ‘या’ निसर्गरम्य शहरात खरेदी केली तब्बल इतक्या कोटींची मालमत्ता

Amitabh Bachchan : बाॅलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी कोट्यवधीची मालमत्ता खरेदी केलीये. काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांनी अयोध्येमध्ये मोठी संपत्ती खरेदी केली. अमिताभ बच्चन यांनी एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. अमिताभ बच्चन ही कोट्यवधीच संपत्तीचे मालक देखील आहेत.

अयोध्येत 14 कोटींची जमीन खरेदी केल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी महाराष्ट्राच्या 'या' निसर्गरम्य शहरात खरेदी केली तब्बल इतक्या कोटींची मालमत्ता
Amitabh Bachchan
| Updated on: Apr 23, 2024 | 12:43 PM
Share

बिग बी अर्थात अमिताभ बच्चन हे कायमच चर्चेत असतात. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अमिताभ बच्चन हे आज कोट्यवधी संपत्तीचे मालक आहेत. हेच नाही तर एक मोठा काळ अमिताभ बच्चन यांनी चित्रपटांमध्ये गाजवला आहे. अमिताभ बच्चन कायमच सोशल मीडियावर सक्रिय देखील दिसतात. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना अमिताभ बच्चन दिसतात. अमिताभ बच्चन कोट्यवधी लोकांच्या मनावर राज्य करतात. काही दिवसांपूर्वीच गुडबाय हा चित्रपट अमिताभ बच्चन यांचा प्रेक्षकांच्या भेटीला आला.

काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी अयोध्यामध्ये मोठी जमीन खरेदी केली. या जमिनीची किंमत कोट्यवधीच्या घरात आहे. नवनवीन प्राॅपर्टी खरेदी करताना अमिताभ बच्चन हे दिसत आहेत. आता अमिताभ बच्चन यांनी अजून एक नवीन जमीन खरेदी केलीये. विशेष म्हणजे ही जमीन खरेदी करण्यासाठी अमिताभ बच्चन यांना कोट्यवधी रूपये हे मोजावे लागले आहेत.

अमिताभ बच्चन यांनी ‘द हाउस ऑफ अभिनंदन लोढा’ यांच्याकडून अलिबागमध्ये तब्बल 10 कोटींमध्ये 10,000 चौरस फूट जमीन विकत घेतली आहे. गेल्याच आठवड्यात या व्यवहाराची नोंद करण्यात आल्याची माहिती ही सूत्रांनी दिली आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये सुरू झालेल्या अलिबागमधील 20 एकरच्या प्लॉट डेव्हलपमेंटमध्ये अमिताभ बच्चन यांनी ही जमीन खरेदी केली आहे.

अमिताभ बच्चन यांनी ‘द शरयू’ या प्रकल्पात याच बिल्डरकडून अयोध्येत जमीन खरेदी केली होती. सतत जमिनीची खरेदी करताना अमिताभ बच्चन हे दिसत आहेत. फक्त अमिताभ बच्चन हे नाही तर अनेक बाॅलिवूड कलाकारांची घरे आलिबागला आहेत. काही दिवसांपूर्वी रणबीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांनी देखील एक बंगला आलिबागला खरेदी केलाय.

बरेच बाॅलिवूड कलाकार हे सुट्ट्यांमध्ये आलिबागला राहणे पसंद करतात. मोठ्या प्रमाणात लोक आलिबागला जमिनीचे व्यवहार करताना दिसत आहेत. त्यामध्ये आता मोठी जमीन अमिताभ बच्चन यांनी आलिबागला खरेदी केलीये. अमिताभ बच्चन हे आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत जुहू येथे राहतात. अनेक शहरांमध्ये अमिताभ बच्चन यांची प्राॅपर्टी आहे. मोठ्या संपत्तीचे मालक अमिताभ बच्चन हे आहेत.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा