AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमिताभ बच्चन यांनी शेअर केले शालेय जीवनातील फोटो, ओळखा पाहू बॉलिवूडच्या ‘बिग बीं’ना…

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे बिग बी देखील म्हटले जाते. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावरही चांगलेच सक्रिय असतात. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतात.

अमिताभ बच्चन यांनी शेअर केले शालेय जीवनातील फोटो, ओळखा पाहू बॉलिवूडच्या 'बिग बीं'ना...
Amitabh Bachchan
| Updated on: Aug 08, 2024 | 2:25 PM
Share

बॉलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन हे कायमच चर्चेत असतात. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. अमिताभ बच्चन हे काैन बनेंगा करोडपतीचे नवीन सीजन घेऊन चाहत्यांच्या भेटीला येत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी सेटवरील काही खास फोटोही शेअर केले. अमिताभ बच्चन यांचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना देखील दिसत आहेत. अमिताभ बच्चन हे काही दिवसांपूर्वीच दीपिका पादुकोण आणि प्रभास यांच्यासोबत चित्रपटात धमाका करताना दिसले.

सोशल मीडियाच्या माध्यमातून अमिताभ बच्चन हे कायमच आपल्या चाहत्यांसोबत काही खास गोष्टी शेअर करताना दिसतात. अमिताभ बच्चन यांनी नुकताच दोन फोटो शेअर केले आहेत. ते फोटो खूप जास्त जुने दिसत आहेत आणि त्यामध्ये शाळेतील मुले दिसत आहेत. या फोटोंची सर्वात खास बाब म्हणजे या फोटोंमध्ये चक्क अमिताभ बच्चन हे आहेत.

होय तुम्ही अगदी खरे ऐकले, जे फोटो अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर शेअर केले. त्यामध्ये अमिताभ बच्चन हे देखील आहेत. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या शालेय जीवनातील हे फोटो शेअर केले. हे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले असून या फोटोवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेले हे फोटो तब्बल 70 वर्ष जुने आहेत. एक स्पर्धा जिंकल्यानंतर हे फोटो काढण्यात आले होते. अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेला एक फोटो ग्रुप फोटो आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये स्वत:अमिताभ बच्चन हे दिसत आहेत. अमिताभ बच्चन यांच्यासोबतच इतरही बरेच विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक फोटोमध्ये दिसत आहेत. अमिताभ बच्चन शालेय जीवनात कसे दिसत होते, हे या फोटोमधून दिसत आहे.

एकाने लिहिले की, हे फोटो ज्यावेळी काढले जात होते, त्यावेळी कोणीतरी विचार केला होता का हा मुलगा इतका मोठा स्टार बनणार याचा? दुसऱ्याने लिहिले की, सर अशाप्रकारचे फोटो शेअर करत जा म्हणजे आम्हाला माहिती मिळेल की, तुम्ही शालेय जीवनात कसे दिसत होते. आता अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेली ही पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसतंय.

Follow Us
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध...
मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान...
Sanjay Raut : मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान, राऊतांच्या दाव्याने खळबळ
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजप...
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजपलाही टाकलं मागे!
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...