Video | कोरोना टेस्ट निगेटिव्ह येताच गोविंदाने भन्नाट स्टाईलमध्ये व्यक्त केला आनंद! पाहा व्हिडीओ…

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता गोविंदा (Govinda) नुकताच कोरोना मुक्त झाला आहे. त्याचे प्रवक्ते पारुल चावला यांनी निवेदन जारी करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती.

Video | कोरोना टेस्ट निगेटिव्ह येताच गोविंदाने भन्नाट स्टाईलमध्ये व्यक्त केला आनंद! पाहा व्हिडीओ...
गोविंदा
Follow us
| Updated on: Apr 08, 2021 | 5:35 PM

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता गोविंदा (Govinda) नुकताच कोरोना मुक्त झाला आहे. त्याचे प्रवक्ते पारुल चावला यांनी निवेदन जारी करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती. आता स्वतः गोविंदाने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो खूप आनंदात दिसत आहे. आपली कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्याची माहितीही गोविंदाने या व्हिडीओ पोस्टसोबत दिली आहे. त्याने या बुमरँग व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘अपुन आ गएला है।’ गोविंदाच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत (Bollywood Actor Govinda tested corona negatives share happy boomerang video on social media).

पाहा गोविंदाचा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Govinda (@govinda_herono1)

या व्हिडीओमध्ये गोविंदा भन्नाट स्टाईलमध्ये दारातून बाहेर पडताना दिसत आहे. तसेच, त्याने सनग्लासेस परिधान केलेले दिसत आहे आणि तो खूप आनंदित दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून चाहतेही खूप प्रतिक्रिया देत आहेत.

(Bollywood Actor Govinda tested corona negatives share happy boomerang video on social media)

गोविंदाला झालेली कोरोनाची लागण

रविवारी गोविंदाच्या प्रवक्त्याने एक निवेदन जारी केले होते की, ‘सर्व आवश्यक खबरदारी घेतल्यानंतरही श्री. गोविंदा आहुजा यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. त्यांच्यात काही लक्षणे दिसत आहेत आणि त्यांनी स्वत:ला अलग केले आहे. श्रीमती सुनीता आहुजा सर्वांना विनंती करू इच्छितात की, मागील काही दिवसांत त्यांच्या अर्थात गोविंदाच्या संपर्कात आलेल्या लोकांनी खबरदारी म्हणून स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी. भारत आणि परदेशातील चाहते, कुटुंब आणि मित्र यांच्या आशीर्वाद सध्या गरज आहे.’

गोविंदाची कारकीर्द

बॉलिवूड अभिनेता गोविंदा याने 1980च्या दशकात अॅक्शन आणि डान्सिंग नायक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. आणि 90च्या दशकात स्वत:ची विनोदी अभिनेता म्हणून ओळख निर्माण केली. त्याच्या ‘मर्डर’, ‘जीते है शान से’ आणि ‘हम’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगले नाव कमावले. 1992मध्ये त्याने ‘शोला और शबनम’ या रोमँटिक चित्रपटात तरूण एनसीसी कॅडेटची भूमिका साकारली होती. तथापि, गोविंदा आजकाल चित्रपटांपासून दूर आहे. पण, व्हिडीओद्वारे तो चाहत्यांचे मनोरंजन करत असतो.

(Bollywood Actor Govinda tested corona negatives share happy boomerang video on social media)

हेही वाचा :

Harshaali Malhotra | ‘बजरंगी भाईजान’ची ‘मुन्नी’ आता बनलीय शायर, वाचा तिची मजेशीर शायरी…

Kartik Aaryan | ‘मेहनत की कमाई’, कार्तिक आर्यनने वाकून केला Lamborghiniला नमस्कार! पाहा व्हिडीओ…

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.