Sussanne Khan | आधी हृतिकसोबत घटस्फोट, आता अली गोनीच्या भावाला डेट करतेय सुझान खान!

हृतिक रोशनबरोबर घटस्फोटानंतर सुझान हृतिकसह मिळून तिच्या दोन मुलांची काळजी घेत आहे. जरी, ती हृतिकपासून विभक्त झाली असली तरी, बहुतेक वेळा ती हृतिकच्या घरी मुलांसमवेत वेळ घालवताना दिसून येते.

Sussanne Khan | आधी हृतिकसोबत घटस्फोट, आता अली गोनीच्या भावाला डेट करतेय सुझान खान!
सुझान खान आणि अर्सलन गोनी

मुंबई : प्रेम, लग्न आणि घटस्फोट या गोष्टी मनोरंजन विश्वात तशा नव्या नाहीत. बॉलिवूड हृतिक रोशन (Hritik Roshan) आणि सुझान खान (Sussanne Khan) बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. तथापि, बॉलिवूडच्या या सर्वात प्रसिद्ध जोडप्याच्या लग्नाच्या तब्बल 14 वर्षानंतर घटस्फोट झाला होता. घटस्फोटानंतरही हृतिक आणि सुझानची मैत्री खूप चांगली असल्याचे दिसते. मात्र, आता हृतिकची माजी पत्नी सुझान तिच्या आयुष्यात पुढे गेली असल्याचे कळते आहे. टीव्ही अभिनेता आणि ‘बिग बॉस 14’ स्पर्धक अली गोनी (Aly Goni) याचा चुलत भाऊ अर्सलन गोनीसोबत (Arslan Goni) सुझान खान रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे (Bollywood Actor Hritik Roshan Ex Wife Sussanne Khan dating aly goni cousin Arslan Goni).

एका प्रसिद्ध वेबसाईटच्या वृत्तानुसार सुझान अर्सलनला डेट करत आहे. दोघेही गेल्या सहा महिन्यांपासून एकमेकांना ओळखतात. सुझान आणि अर्सलन टीव्ही जगातील त्यांच्या कॉमन मित्रांद्वारे भेटले, असे या सूत्रांनी उद्धृत केलेल्या अहवालात म्हटले आहे.

मैत्रीपेक्षा अधिक…

ते पुढे म्हणतात की, ‘त्यांची केमिस्ट्री पाहिल्यास असे दिसते की, दोघांमध्ये मैत्रीहून अधिक काही तरी नातं फुलतंय. अर्सलन आणि सुझान बर्‍याचदा टीव्ही इंडस्ट्रीमधील आपल्या मित्रांसह हँगआऊट करताना दिसतात. 2014 मध्ये हृतिक रोशनशी तुटलेल्या नात्यानंतर आता सुझान हळू हळू पुढे जात आहे.  मात्र, सुझान आणि अर्सलन यांच्या या नातेसंबंधाबाबत अद्याप दोन्हीही सेलेब्रिटींनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या वृत्ताला त्याने अद्याप काहीही म्हटलेले नाही.

पाहा सुझान आणि अर्सलनचा फोटो :

View this post on Instagram

A post shared by Arslan Goni (@arslangoni)

 (Bollywood Actor Hritik Roshan Ex Wife Sussanne Khan dating aly goni cousin Arslan Goni)

कोण आहे अर्सलन?

नात्याने अली गोनीचा चुलत भाऊ असणारा अर्सलन गोनी हा अभिनेता आहे. त्याचे इंस्टाग्राम अकाऊंट पाहता हे लक्षात येत की, अर्सलन टीव्ही जगातील अनेक नामांकित व्यक्तींसह चांगले बॉन्डिंग शेअर करतो. निर्माता एकता कपूरसोबतही अर्सलनचे काही फोटो आहेत.  अर्सलनने ऑल्ट बालाजीची ‘मै हिरो बोल रहा हू’ ही वेब सीरीजवर साईन केली आहे. यात तो नकारात्मक पात्र साकारतान दिसणार आहे. 2017मध्ये अभिनेत्री रिचा चड्ढा आणि कल्की केकलानसोबत तो ‘जिया और जिया’ या चित्रपटामध्ये दिसला होता.

सुझान सध्या काय करतेय?

सुझानबद्दल बोलायाचे, तर कामाच्या निमित्ताने ती सध्याच्या काळात अलिबागमध्ये दिसते आहे. तिने स्वतःच एक फोटो शेअर केला आणि सांगितले की, ती अलिबागमध्ये एका प्रोजेक्टसाठी काम करत आहे. हृतिक रोशनबरोबर घटस्फोटानंतर सुझान हृतिकसह मिळून तिच्या दोन मुलांची काळजी घेत आहे. जरी, ती हृतिकपासून विभक्त झाली असली तरी, बहुतेक वेळा ती हृतिकच्या घरी मुलांसमवेत वेळ घालवताना दिसून येते. लॉकडाऊन दरम्यानही सुझान हृदान आणि रेहान या दोन्ही मुलांसाठी हृतिकच्या घरी राहायला गेली होती. शिवाय कंगना प्रकरणातही सुझानने हृतिकची बाजू घेतली होती.

(Bollywood Actor Hritik Roshan Ex Wife Sussanne Khan dating aly goni cousin Arslan Goni)

हेही वाचा :

Bollywood Corona | मनोरंजन विश्वात कोरोनाची दहशत, बॉलिवूडचे आणखी दोन मोठे कलाकार कोरोनाच्या विळख्यात!

Kangana Ranaut | कंगनाच्या अडचणी आणखी वाढणार! मुंबई पोलिसांनी दाखल केला नवा एफआयआर

Published On - 9:10 am, Sun, 14 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI