नवाजुद्दीन सिद्दीकी ईदसाठी मुंबईहून उत्तर प्रदेशला, 14 दिवस सहकुटुंब क्वारंटाईन

नवाझुद्दीन सिद्दीकी आणि त्याचे कुटुंबीय लॉकडाऊनच्या काळात मुंबईहून उत्तर प्रदेशातील बुढाना या गावी गेले. (Bollywood actor Nawazuddin Siddiqui home quarantine)

नवाजुद्दीन सिद्दीकी ईदसाठी मुंबईहून उत्तर प्रदेशला, 14 दिवस सहकुटुंब क्वारंटाईन

नवी दिल्ली : देशभरात ‘कोरोना व्हायरस’च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा चौथा टप्पा जाहीर झाला आहे. मात्र बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याचे कुटुंबीय ईद साजरी करण्यासाठी मुंबईहून उत्तर प्रदेशला गेले. त्यामुळे नवाजुद्दीनसह त्याच्या कुटुंबियांना 14 दिवस होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. (Bollywood actor Nawazuddin Siddiqui home quarantine)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवाझुद्दीन सिद्दीकी आणि त्याचे कुटुंबीय लॉकडाऊनच्या काळात मुंबईहून उत्तर प्रदेशातील बुढाना या गावी गेले. आंतरराज्य प्रवास केल्याने नवाझुद्दीनच्या सर्व कुटुंबाला 14 दिवसांसाठी घरीच अलग ठेवण्यात आले आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी शुक्रवारी आपल्या कुटुंबासह बुढाना गावी पोहोचला. तिथे त्या सर्वांची पूर्ण तपासणीही करण्यात आली. नवाजुद्दीन आणि त्याच्यासोबत असलेल्या सर्व सदस्यांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकी महाराष्ट्र सरकारच्या परवानगीने खासगी वाहनातून आपल्या गावी पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे.

नवाजुद्दीनच्या ‘घुमकेतू’ चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. त्यामुळे नवाज सोशल मीडियावर चर्चेत आहे. कॉमेडी आणि ड्रामाची फोडणी असलेला हा टीझर सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड होत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीचा हा चित्रपट 22 मे रोजी झी5 वर रिलीज होणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *