AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhurandhar 2 BO Day 9: बॉक्स ऑफिसवर ‘धुरंधर 2’ ची दहशत, सिनेमाने 9 दिवसांत कमावले इतके कोटी, आकडा जाणून व्हाल थक्क

Dhurandhar 2 BO Day 9: बॉक्स ऑफिसवर अभिनेता रणवीर सिंग स्टारर 'धुरंधर 2' सिनेमा रोज नवीन विक्रम रचत आहे. आता सिनेमाच्या 9 दिवसांच्या कमाईचे आकडे समोर आले आहे. ज्यामुळे सर्वत्र फक्त आणि फक्त 'धुरंधर 2' सिनेमाची चर्चा रंगली आहे.

Dhurandhar 2 BO Day 9: बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर 2' ची दहशत, सिनेमाने 9 दिवसांत कमावले इतके कोटी, आकडा जाणून व्हाल थक्क
Dhurandhar 2
| Updated on: Mar 28, 2026 | 9:01 AM
Share

Dhurandhar 2 BO Day 9: दिग्दर्शत आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर 2’ सिनेमाची दहशत सध्या बॉक्स ऑफिसवर दिसून येत आहे. ‘धुरंधर’ सिनेमाने देखील सर्व रेकॉर्ड मोडले होते. आता ‘धुरंधर 2’ सिनेमा रोज नवीन विक्रम रचताना दिसत आहे… पहिल्या आठ दिवसांत सिनेमाने बक्कळ कमाई केली आहे. आता 9 व्या दिवसाची कमाई देखील समोर आली आहे. एवढंच नाही तर, आज आणि उद्या शनिवार आणि रविवार असल्यामुळे ‘धुरंधर 2’ सिनेमा किती रुपयांपर्यंत मजल मारेल हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. सिनेमाने दुसऱ्या शुक्रवारी देखील दमदार कमाई केली आहे… तर जाणून घ्या दुसऱ्या शुक्रवारी म्हणजे 9 व्या दिवशी सिनेमाने किती कमाई केली आहे.

‘धुरंधर 2’ सिनेमाची 9 व्या दिवसाची कमाई किती?

सध्या ‘धुरंधर 2’ सिनेमाची बॉक्स ऑफिसवर दहशत आहे.. सिनेमाने बक्कळ कमाई करत आहे. सिनेमाने 9 व्या दिवशी देखील निर्मात्यांना मालामाल केलं आहे, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिनेमा रोज 40 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई करत आहे. एवढंच नाही तर, ‘धुरंधर 2’ सिनेमाने अभिनेता शाहरुख खान आणि सलमान खान यांसारख्या बड्या सेलिब्रिटींच्या सिनेमांचा रेकॉर्ड देखील मोडला आहे.

‘धुरंधर 2’सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल सांगायचं झालं तर, पहिल्याच आठवड्यात सिनेमाने 624.47 कोटी रुपयांचा गल्ला ओलांडला आहे… सिनेमाने आठव्या दिवशी 40.70 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. तर दुसरीकडे, सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘धुरंधर 2’ ने प्रदर्शनाच्या नवव्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या शुक्रवारी 41.55 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यामुळे ‘धुरंधर 2’ ची भारतातील 9 दिवसांतील एकूण कमाई 715.72 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

‘धुरंधर 2’ सिनेमा बॉलिवूडच्या अन्य हीट सिनेमांना मागे टाकणार असल्याचं चित्र याठिकाणी दिसत आहे… सिनेमाने आतापर्यंत ‘पठाण’, ‘जवान’, ‘स्त्री 2’, ‘छावा’ यांसारख्या सिनेमांना मागे टाकलं आहे. ‘धुरंधर 2’ आता ‘पुष्पा 3’ (हिंदी) च्या 836.09 कोटी आणि त्याचा आधीचा भाग ‘धुरंधर’च्या 894.49 कोटींच्या लाईफटाईम कलेक्शनला मागे टाकण्याच्या अगदी जवळ आहे.

‘धुरंधर 2’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, 19 मार्च रोजी प्रदर्शित झालेला सिनेमा आता मोठी कमाई करत आहे… सिनेमात रणवीर सिंग याच्यासोबत सारा अर्जुन, राकेश बेदी, अर्जुन रामपाल, संजय दत्त आणि आर माधवन यांसारख्या अन्य सेलिब्रिटींनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा