मला विसरू नका, माफ करा; प्रसिद्ध अभिनेत्याची धक्कादायक पोस्ट; नेमकं झालं तरी काय?
सध्या सोशल मीडियावर एका प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये त्याने ‘मला विसरू नका, माफ करा’ असे म्हटले आहे. या पोस्टमुळे खळबळ माजली आहे. आता नेमकं प्रकरण काय? चला जाणून घेऊया...

बॉलिवूडमधील इंडस्ट्रीमधील प्रत्येक कलाकार हा कायमच चर्चेत असतो. कधी तिच्या आगामी प्रोजेक्ट्समुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. हे कलाकार सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असतात. सध्या सोशल मीडियावर एका अभिनेत्याची पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. या अभिनेत्याने अनेक सुपरहिट मालिका तसेच चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता त्याने पोस्टमध्ये ‘मला विसरू नका, माफ करा’ असे म्हटले आहे. हा अभिनेता नेमका कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
कोण आहे हा अभिनेता?
आम्ही ज्या अभिनेत्याविषयी बोलत आहोत तो दुसरा तिसरा कोणी नसून टीव्ही आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रोनित रॉय आहे. त्याने सोशल मीडियापासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने इन्स्टाग्रामवर या संदर्भात माहिती दिली आहे. ब्रेक घेण्यामागे कारण सांगताना त्याने कुटुंबासाठी हा निर्णय असल्याचे सांगितले आहे. यासोबतच चाहत्यांपासून दूर राहण्यासाठी माफी मागताना, लोक त्याला विसरू नयेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
View this post on Instagram
खरेतर, रोनित रॉयने इन्स्टाग्रामवर लांबलचक नोट लिहून सांगितलं की, तो जीवनात अशा टप्प्यावर पोहोचले आहेत जिथे स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी नवीन मार्ग शोधावा लागेल. आता रोनितच्या आयुष्यात नेमकं काय सुरु आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
रोनित रॉयने पोस्टमध्ये काय लिहिलं?
रोनित रॉयने इन्स्टाग्रामवर सोशल मीडियापासून दूर राहण्याच्या निर्णयाबद्दल लिहिले की, ‘हॅलो, मी जे सांगणार आहे ते प्रेम, समज आणि कोमलतेने सांगणार आहे. तुम्हा सर्वांना माहिती आहे की मी तुमच्यावर प्रेम करतो. मी स्क्रोल करतो, तुमच्या पोस्ट्स लाईक करतो, कमेंट करतो आणि शक्य तेवढे डीएमचे उत्तर देतो. मला जे मिळालं आहे त्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे. मी प्रत्येक गोष्ट जपतो. विशेषतः तुम्हा सर्वांपासून मिळालेले प्रेम आणि सन्मान, मी जपतो आणि हृदयाजवळ ठेवतो.’
त्याने पुढे लिहिले की, ‘तरीही, मी जीवनात अशा ठिकाणी पोहोचलो आहे जिथे मला स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी नवीन मार्ग शोधावा लागेल. असा मार्ग जो आशा आहे की मला एक व्यक्ती, नातेसंबंध आणि अभिनेत्याच्या रूपात चांगला बनवेल. हा असा मार्ग आहे ज्यावर मी आधी कधी चाललो नाही. आराम आणि जुन्या वाईट सवयी सोडून द्या. उडी मारा आणि मुख्य रस्त्यापासून दूर जीवन जगा. भीती वाटते… मला माहिती आहे… पण हे करावे लागेल.’
