AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सैफ अली खान हल्ला करणाऱ्या आरोपीविरोधात ठोस पुरावा पोलिसांच्या हाती

सैफ अली खानवर अटक करणाऱ्या आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या त्याची कसून पोलीस चौकशी सुरु आहे. त्यातच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सैफ अली खान हल्ला करणाऱ्या आरोपीविरोधात ठोस पुरावा पोलिसांच्या हाती
saif ali khan
| Updated on: Jan 23, 2025 | 3:51 PM
Share

 Saif Ali Khan Attack : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी (16 जानेवारी) प्राणघातक हल्ला झाला. सैफ अली खानच्या घरी चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या एका चोराने चाकू हल्ला केला. या हल्ल्यात सैफ अली खानला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या सैफ अली खानला डिस्चार्ज देण्यात आला असून त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर दुसरीकडे या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या विजय दासला अटक करण्यात आली आहे. ठाण्यातील कासारवडवली भागातून त्याला अटक करण्यात आली. सैफ अली खानवर अटक करणाऱ्या आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या त्याची कसून पोलीस चौकशी सुरु आहे. त्यातच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सैफ अली खानवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर 4 दिवसांनी मुंबई पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद उर्फ ​​विजय दास असे या आरोपीचे नाव आहे. तो बांगलादेशचा नागरिक असल्याचा दावा पोलिसांनी केला होता. आता चौकशीदरम्यान विजय दास हा बांगलादेशी असल्याचा एक ठोस पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याचा वाहतुकीचा परवाना समोर आला आहे. हा परवाना बांगलादेशातील असून त्यावर नाव, पत्ता, जन्मदिनांक तसेच इतर माहितीही नमूद करण्यात आली आहे.

सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचे लायसन्स पोलिसांच्या हाती

सैफवर हल्ला करणाऱ्या मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याचे वाहतुकीचे लायसन्स पोलिसांच्या हाती लागले आहे. या लायसन्सवर बांगलादेश रोड ट्रान्सपोर्ट ऑथरिटी असे लिहिण्यात आले आहे. यावर बरिसल असे लिहिण्यात आले असून त्याचा पत्ताही बरिसल सदर, बरिसल असा आहे.

शहजादला हे लायसन्स 21 नोव्हेंबर 2019 ला बांगलादेश रोड ट्रान्सपोर्ट ऑथरिटीकडून देण्यात आले आहे. हे लायसन्स 21 फेब्रुवारी 2020 रोजी संपले आहे. हे लायसन दुचाकी आणि हलक्या वाहनांसाठी देण्यात आले आहे. यावर त्याची 12 मार्च 1994 अशी त्याची जन्मतारीखही दिसत आहे. तसेच यावर त्याचा फोन नंबरही नमूद करण्यात आला आहे. यासोबतच यावर त्याचा फोटोही पाहायला मिळत आहे.

नवी मुंबईत बांगलादेशी नागरिकांवर कारवाई

दरम्यान अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा बांगलादेशी असल्याचे समोर येताच नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे ॲक्शन मुडवर दिसून येत आहे. सध्या नवी मुंबईत अनेक बांगलादेशी नागरिकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. नवी मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी राहताना दिसून येत आहेत. झोपड्या, अनधिकृत बांधकामांमध्ये यात बांगलादेशी आश्रय घेत आहेत. तसेच यांनी बनावट पॅनकार्ड, आधारकार्डही बनवले आहेत.

गेल्या महिनाभरामध्ये बांगलादेशातील संशयित म्हणून हजारोंपेक्षा अधिक नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे.  तर 125 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच 300 जणांचे कागदपत्र तपासण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे कागदपत्र आढळून आले तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाणार आहे. आतापर्यंत 50 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Follow Us
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?