सलमान खान म्हणतो, ‘मैं चला तेरी तरफ…’, नवं गाणं रिलीज, एका तासात 1 मिलीयनहून अधिक व्हूज

सलमान खान म्हणतो, 'मैं चला तेरी तरफ...', नवं गाणं रिलीज, एका तासात 1 मिलीयनहून अधिक व्हूज
सलमान खान

मुंबई : बॉलीवूडचा टायगर सलमान खान (salman khan) त्याच्या चाहत्यांसाठी सतत नवनवीन गोष्टी घेऊन येत असतो. आजही तसंच काहीसं खास गिफ्ट सलमान त्याच्या चाहत्यांसाठी घेऊन आलाय. सलमानचं नवं गाणं आज प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. ‘मैं चला’ (main chala) हे सलमानचं नवं गाणं त्याच्या चाहत्यांच्या पसंतीला उतरतंय. हे गाणं रिलीज झाल्याची माहिती सलमानने स्वत: त्याच्या ट्विटरवरून दिली […]

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

Jan 22, 2022 | 1:01 PM

मुंबई : बॉलीवूडचा टायगर सलमान खान (salman khan) त्याच्या चाहत्यांसाठी सतत नवनवीन गोष्टी घेऊन येत असतो. आजही तसंच काहीसं खास गिफ्ट सलमान त्याच्या चाहत्यांसाठी घेऊन आलाय. सलमानचं नवं गाणं आज प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. ‘मैं चला’ (main chala) हे सलमानचं नवं गाणं त्याच्या चाहत्यांच्या पसंतीला उतरतंय. हे गाणं रिलीज झाल्याची माहिती सलमानने स्वत: त्याच्या ट्विटरवरून दिली आहे. एका तासात या गाण्याला 1 मिलीयनहून जास्त व्हूज मिळाले आहेत.

सलमान खानचं ट्विट
सलमानने नुकतंच एक ट्विट केलं आहे. त्यात त्याने आपलं नवं आऊट झाल्याची माहिती दिली आहे. ‘मैं चला’ हे सलमानचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. काल या गाण्याचा टिझर प्रदर्शित झाला. तर आज हे संपूर्ण गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. आणि ते सलमानच्या चाहत्यांना आवडल्याचंही पहायला मिळतंय.

गाणं कुणी गायलं आहे?

‘मैं चला’ हे गाणं पंजाबी गायक गुरू रंधावा आणि सलमानची जवळची मैत्रिण यूलिया वंतूरने गायलं आहे. तर तेलगू अभिनेत्री प्रज्ञा जायसवाल सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसतेय. सध्या या गाण्याचा फक्त टिझर आला आहे. हे गाणं आता प्रदर्शित झालंय.

सलमानचा लूक

अभिनेता सलमान खान नेहमी वेगवेगळ्या जॉनरच्या भूमिका करताना दिसतो. आताही या नव्या गाण्यात सलमान एका वेगळ्या लूकमध्ये पहायला मिळतोय. यात सलमानचे केस खूप मोठे दाखवण्यात आले आहेत. सलमान पंजाबी लूकमध्ये दिसतोय. त्याने पगडी घातलेली पहायला मिळतेय. त्यामुळे त्याचा नवा लूक आणि त्याचं गाणं प्रेक्षकांना किती भावतं हे पाहणं महत्वाचं असेल.

संबंधित बातम्या

संगीत रंगभूमीच्या व्रतस्थ शिलेदार हरपल्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कीर्ती शिलेदार यांना श्रद्धांजली

Priyanka Chopra Surrogacy पद्धतीनं आई बनली, वाचा काय असते सरोगसी, भारतात यासंबंधीचे नियम काय?

अमोल कोल्हेंच्या समर्थनार्थ नाना पाटेकर मैदानात, म्हणाले, भूमिका केली म्हणजे…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें