अमोल कोल्हेंच्या समर्थनार्थ नाना पाटेकर मैदानात, म्हणाले, भूमिका केली म्हणजे…

अमोल कोल्हेंच्या समर्थनार्थ नाना पाटेकर मैदानात, म्हणाले, भूमिका केली म्हणजे...
नाना पाटेकर, अमोल कोल्हे

राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे (dr. amol kolhe) यांना पाठिंबा दिला आहे. 'अमोल कोल्हे यांनी अभिनय केला. अभिनय केल्याने नथुराम गोडसेच्या विचारांचं समर्थन केलं असं होत नाही', असं नाना पाटेकर म्हणालेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

Jan 22, 2022 | 10:48 AM

पुणे : ‘Why I killed Gandhi’ या चित्रपटामुळे सध्या महाराष्ट्राचं सामाजिक-राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. कुणी अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेच्या (nathuram godadse) केलेल्या भूमिकेचं समर्थन करतंय तर कुणी त्यांनी ही भूमिका करायला नको होती, असं म्हणतंय. अशात अभिनेते नाना पाटेकर (nana patekar) यांनी राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे (dr. amol kolhe) यांना पाठिंबा दिला आहे. ‘अमोल कोल्हे यांनी अभिनय केला. अभिनय केल्याने नथुराम गोडसेच्या विचारांचं समर्थन केलं असं होत नाही’, असं नाना पाटेकर म्हणालेत.

नाना पाटेकर यांचा अमोल कोल्हे यांना पाठिंबा

नाना पाटेकर आपल्या रोखठोक भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत. आताही Why I killed Gandhi या चित्रपटावरून सुरू असलेल्या वादावर नाना पटेकरांनी आपलं मत मांडलं आहे. ‘मीही ‘लास्ट व्हाईस रॉय माउंट बॅटन’ या चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका केली आहे. अमोल कोल्हे यांनी केवळ अभिनय केला. अभिनय केल्याने नथुराम गोडसेच्या विचारांचं समर्थन केलं, असं होत नाही’, नाना पाटेकर म्हणालेत. ‘तसंच कुणी कोणती भूमिका करावी हा त्यांचा प्रश्न आहे. यापेक्षा महत्वाचे विषय सध्या समाजात आहेत. त्यावर बोलणं गरजेचं आहे’, असं नाना पाटेकर म्हणालेत.

मी गोडसेच्या विचारांचं उदात्तीकरण करत नाही – कोल्हे

‘तो काळ असा होता जेव्हा मी कलाकार म्हणून स्वत: ला सिद्ध करत होतो. वेगवेगळ्या जॉनरच्या भूमिका करत होतो. हिंदी चित्रपटासाठी ही भूमिका माझ्यासमोर आली. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की, ‘ही माझ्या वैचारिक भूमिकेच्या विरोधातली भूमिका आहे. मी या भूमिकेचं कुठेही समर्थन करत नाही.’ त्यावेळी मला सांगण्यात आलं की, ‘कोर्टामध्ये-चौकशी आयोगासमोर नथुरामने जे स्टेटमेंट दिलंय तेच स्टेटमेंट तुम्हाला या भूमिकेच्या माध्यमातून मांडायचं आहे.’ पब्लिक डोमेनमध्ये असलेली गोष्टच जर मला सगळ्यांसमोर मांडायची आहे, तर तेव्हा मला खरोखर असं त्यावेळी वाटलं नाही की मी त्या विचारधारेचं उदात्तीकरण करतोय.’

‘ती’ फक्त भूमिका मी गांधींना मानणारा व्यक्ती

नथुराम गोडसे ही फक्त माझी त्या सिनेमातली भूमिका आहे. वैयक्तिक आयुष्यात गोडसेच्या कृतीचं किंवा त्या विचारांचं मी समर्थन करत नाही. मी महात्मा गांधी यांना मानणारा व्यक्ती आहे, असं म्हणत ती फक्त आपली चित्रपटातली भूमिका असल्याचं अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं आहे.

शरद पवारांकडून कोल्हेंची पाठराखण

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना अमोल कोल्हे यांची बाजू घेतली. तसेच सिनेमातील भूमिका आणि व्यक्तिगत आयुष्य यात फरक असल्याचंही त्यांनी निदर्शनास आणून दिलं. गांधीवरील सिनेमा अमेरिकेतून प्रदर्शित झाला. गांधी सिनेमा जगात गाजला. त्यामुळे जगात गांधींना महत्त्व आलं. त्या सिनेमात कुणीतरी गोडसेची भूमिका केली. ती भूमिका करणारा आर्टिस्ट होता. नथुराम गोडसे नव्हता. कोणत्याही सिनेमात आर्टिस्ट एखादी भूमिका करत असेल तर त्याकडे आर्टिस्ट म्हणून पाहिलं पाहिजे. शिवाजी महाराज आणि औरंगजेब संघर्ष झाला. शिवाजी महाराजांच्या सिनेमात जर कुणी शिवाजी महाराजांची भूमिका घेत असेल आणि कुणी औरंगजेबाची भूमिका करत असेल तर औरंगजेबाची भूमिका करतो म्हणून तो मोगल साम्राज्याचा पुरस्कर्ता होत नाही. तो कलावंत म्हणून भूमिका करत असतो. किंवा रामराज्यातील सिनेमा असेल तर राम रावणाचा संघर्ष असेल रावणाची भूमिका करणारा व्यक्ती रावण असू शकत नाही. तो कलाकार असतो. सीतेचं अपहरण दाखवलं म्हणजे त्या कलाकाराने अपहरण केलं असं होत नाही. रावणाचा तो इतिहास या माध्यमातून दाखवला जातो, असं सांगतानाच अमोल कोल्हेंनी भूमिका साकारली असेल तर ती कलावंत म्हणून केली आहे. त्याकडे कलाकार म्हणूनच पाहिलं पाहिजे, असं पवार म्हणाले.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें