AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्यात वाद, अभिनेता म्हणाला, तिने मला…

अभिनेत्री कतरिना कैफ हिने आतापर्यंत अनेक हीट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. कतरिना कैफ हिने विकी काैशल याच्यासोबत 2021 मध्ये लग्न केले. राजस्थानमध्ये अत्यंत शाही पद्धतीने यांचा विवाहसोहळा झाला. विकी आणि कतरिना यांनी त्यांच्या लग्नाचे फोटोही शेअर केले.

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्यात वाद, अभिनेता म्हणाला, तिने मला...
Katrina Kaif and Vicky Kaushal
| Updated on: Aug 29, 2024 | 5:58 PM
Share

बॉलिवूड अभिनेता विकी काैशल हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. काही दिवसांपूर्वी विकी काैशल आणि सारा अली खान यांचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे त्यांच्या चित्रपटाने धमाका केला. विकी काैशल आणि कतरिना कैफ यांनी 2021 मध्ये लग्न केले. राजस्थानमध्ये यांचा विवाहसोहळा अत्यंत खास पद्धतीने पार पडला. लग्नानंतर काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. नेहमीच विकी काैशल आणि कतरिना कैफ हे एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. कतरिना कैफ हिने काही दिवसांपूर्वीच पती विकी काैशल याच्या चित्रपटाचे प्रमोशन सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केले होते.

विकी काैशल आणि कतरिना कैफ यांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते. एका मुलाखतीमध्ये विकी काैशल याने कतरिना कैफ हिच्यासोबतच्या वादावर भाष्य केले. या मुलाखतीमध्ये त्याने दोघांमध्ये कोणत्या कारणामुळे कायमच वाद होतात हे सांगितले आहे. विकी काैशल म्हणाला की, एकाच कारणामुळे माझ्यात आणि कतरिनात वाद होतात.

कपाटातील जागेवरून आमच्यात वाद होतात. तिने तिचे साहित्य दीड खोलीमध्ये ठेवले आहे आणि माझ्याकडे एक वॉर्डरोब आहे जो लवकरच ड्रॉवर बनू शकेल. हा खुलासा त्याने करण जोहरच्या शोमध्ये केला. विकी काैशल याचे हे बोलणे ऐकून करण त्याला बिचारा म्हणताना देखील दिसला. 

करणने म्हटले की, शेवटी ती एक ‘हिरोईन’ आहे…काही दिवसांपूर्वीच विकी काैशल आणि कतरिना कैफ हे त्यांच्या लग्नाचा वाढदिवस विदेशात साजरा करताना दिसले. कतरिना कैफ ही विकी काैशल याच्या अगोदर रणबीर कपूर याला डेट करत होती. हेच नाही तर कतरिना कैफ हिच्यामुळेच दीपिका आणि रणबीरचे नाते तुटल्याचेही सांगितले जाते. 

सलमान खान याच्यासोबतही कतरिना कैफ हिचे नाव जोडले गेले होते. दोघे अनेकदा एकसोबत स्पॉट होताना देखील दिसले. विकी काैशल याला अनेक दिवस डेट केल्यानंतर कतरिनाने लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न करण्याच्या अगोदरच कतरिनाने एक मोठी धमकी दिल्याचेही विकी काैशल याने सांगितले होते. लग्नाच्या दोन दिवसांनीच चित्रपटाची शूटिंग करणार असशील तर लग्न नाही करायचे असेच थेट कतरिनाने म्हटले होते.

Follow Us
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडी..
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडीचे निर्देश
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या...
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या चरणी विशेष प्रार्थना
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकरी...
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश