Vicky Kaushal | ‘त्यांनी स्वतःला आग लावली, १० व्या मजल्यावरुन उडी मारली…’ विकीकडून वडिलांबद्दल मोठा खुलासा
वडिलांचा संघर्षबाबत सांगत विकी कौशलने केला मोठा खुलासा; मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या विकीचं कसं होतं बालपण... अभिनेत्याच्या वडिलांचा थक्क करणारा प्रवास...

मुंबई | 26 जुलै 2023 : अभिनेता विकी कौशल याने अनेक सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या विकीने लहानपणी अनेक गोष्टींचा समाना केला. विकी कौशल आणि भाऊ सनी कौशल यांच्यासाठी वडील श्याम कौशल यांनी प्रचंड मोठा संघर्ष केला आहे. वडिलांच्या संघर्षाबद्दल सांगत असताना अभिनेता भावुक झाला. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने वडिलांच्या संघर्षाबद्दल मोठा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त विकी कौशल यांच्या वडिलांच्या संघर्षाची चर्चा होत आहे. वडिलांनी मोठा संघर्ष केल्यानंतर अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं आहे.
नुकताच झालेल्या मुलाखतीत विकी कौशल याने वडिलांच्या संघर्षाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ‘ऍक्शन दिग्दर्शक म्हणून बाबांची ओळख आहे. पण ते आधी एक स्टंटमॅन होते. इंडस्ट्रीमध्ये त्यांनी जवळपास १० वर्ष काम केलं. स्टंट करताना त्यांना सुरक्षा देखील दिली जात नव्हती. तरी देखील ते स्टंट करायचे.’ (vicky kaushal father)
पुढे अभिनेता म्हणाला, ‘स्टंटसाठी त्यांनी स्वतःला आग लावून घेतली. १० व्या मजल्यावरुन उडी मारली.. त्यांनी आमच्यासाठी खूप मेहनत घेतली. पण त्यांनी मेहनत घेतली नसती, तर आमचा सांभाळ कसा केला असता? स्टंट करताना ते जखमी देखील झाले होतं. तेव्हा वडिलांच्या उपचारासाठी देखील आमच्याकडे पैसै नव्हते.
‘वडिलांनी मला कायम इतर अभिनेते आणि माझ्यातील अंतर दाखवून दिला. दुसऱ्या अभिनेत्यांप्रमाणे तुला घरासाठी फिरण्याची गरज नाही कारण शहरात तुझ्याकडे घर आहे…’ असं विकीचे वडील कायम मुलाला सांगायचे. विकी कायम त्याच्या कुटुंबाबद्दल चाहत्यांना सांगत असतो.
विकी सोशल मीडियावर देखील आई-वडिलांसोबत फोटो पोस्ट करत असतो. अनेक ठिकाणी अभिनेत्याला आई – वडिलांसोबत स्पॉट देखील करण्यात आलं आहे. सध्या फक्त आणि फक्त विकी याची चर्चा रंगत आहे. विकीने आता पर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आणि चाहत्यांचं प्रेम मिळवलं.
विकी फक्त सिनेमांमुळेच नाही तर, अभिनेत्री कतरीना कैफ हिच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील चर्चेत असतो. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर विकी – कतरिना यांनी मोठ्या थाटात लग्न केलं. लग्नापूर्वी दोघांनी देखील त्यांच्या नात्याचा स्वीकार केला नाही. पण लग्नानंतर दोघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. विका आणि कतरिना कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतात.
