करिश्मा आणि करीनाचे या भावाशी अजिबात जमत नाही; तो आहे बॉलिवूडचा देखणा अभिनेता
करीना आणि करिश्मा कपूर यांचा आत्येभाऊ हा बॉलिवूडचा एक प्रसिद्ध अभिनेता आहे. कपूर कुटुंबाशी असलेल्या त्यांच्या नातेसंबंधाबाबत फार कमी माहिती आहे. हा अभिनेता त्यांचा आत्येभाऊ लागतो. पण त्यांच्यात कधीही संभाषण झालेलं पाहण्यात आलं नाही. तसेच तो कधीही कपूर कुटुंबाचा भाग होताना दिसला नाही. कोण आहे हा अभिनेता ओळखलं का?

बॉलिवूडमध्ये अनेक अशी घराणे आहे ज्यांची चर्चा कायमच असते. तसेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी देखील पडद्यावरील कथेपेक्षा फार काही वेगळ्या नसतात. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक घटानांची चर्चा होताना दिसते. बॉलिवूडमध्ये घराणेशाही तशीही खूप दिसून येते. त्यामुळे बाहेरील लोकांना बॉलिवूडमध्ये टिकून राहणे कठीण होते. त्यातीलच एक घराणं,त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकजण स्टार आहेत. हे घराणं म्हणजे कपूर घराणं.
अभिनेता करीना आणि करिश्माचं अभिनेता तथा आत्ये भावाशी अजिबात जमत नाही
कपूर कुटुंबातील प्रत्येक पिढी ही अभिनयात आहे. तसेच कोणत्याही कार्यक्रमाला देखील त्यांच्या कुटुंबातील सदस्य हे एकत्र दिसतात. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटले की बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान आणि लोलो करिश्मा कपूर यांच्यासोबत खास नातं असलेला एक अभिनेता बॉलिवूडमध्ये आहे. पण या दोघींचंही त्याच्याशी फार काही जमत नाही. तो अभिनेता करीना आणि करिश्माचा मामे भाऊ लागतो. या अभिनेत्याचा कपूर कुटुंबाशी इतका मोठा संबंध असूनही, तो बॉलिवूडमध्ये एका वेगळ्या गटात दिसतो. हा बॉलिवूडचा ऐकेकाळचा सुपरस्टार आणि देखणा अभिनेता म्हणजे आफताब शिवदासानी.
करीना, करिश्मा यांच्यातील आणि या अभिनेत्याच्या नात्याबद्दल फार कोणाला माहित नाही
करिश्मा आणि करीना कपूर या शो-मॅन राज कपूर यांच्या नात आणि रणधीर कपूर यांच्या मुली आहेत. रणधीर कपूर यांची पत्नी बबिता आहे, ज्यांचे लग्नापूर्वी आडनाव शिवदासानी होते. आफताबचे वडील प्रेम शिवदासानी हे अभिनेत्री बबिताचे वडील हरी शिवदासानी यांचे भाचे होते. म्हणजे बबिता ही आफताबची आत्या लागते असं म्हटलं जातं. अशाप्रकारे, करिश्मा आणि करीना हा आफताबच्या आत्तेबहिणी लागतात आणि आफताब त्यांचा मामेभाऊ लागतो. करीना आणि आफताब ‘कंबख्त इश्क’ चित्रपटात एकत्र दिसले होते. पण आफताब आणि करीना, करिश्मा यांच्यातील नाते फार कमी लोकांना माहिती आहे.
Aftab Shivdasani Instagram
View this post on Instagram
नात्यांमधील दरी आजही दिसते.
बबिता आणि ज्येष्ठ अभिनेत्री साधना या देखील बहिणी आहेत. आफताबची मावशी साधना आणि बबिता बहिणी असूनही एकमेकांशी बोलत नव्हत्या. दोन्ही कुटुंबांमध्ये अंतर होते. काही वृत्तांनुसार, हे वैयक्तिक कारणांमुळे होते. दोघीही त्यांच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. आणि तेव्हापासून चालत आलेली नात्यांमधील दरी आजही दिसते. एकत्र काम केलं असलं तरी देखील करिश्मा आणि करीना आफताबसोबत कुटुंबीय नाते ठेवत नाही.
अभिनेत्याच्या वर्कफ्रंट बोलायचं झालं तर
आफताब शिवदासानी लहानपणापासूनच चित्रपटांमध्ये सक्रिय आहे आणि अनेक चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून दिसला आहे. आफताबने अनिल कपूरच्या मिस्टर इंडिया आणि अमिताभ बच्चनच्या शहेनशाह या चित्रपटात विजय कुमार श्रीवास्तवची बालपणीची भूमिका साकारली होती. याशिवाय, तो चालबाज, अव्वल नंबर आणि इन्सानियतमध्ये बाल कलाकार म्हणून दिसला आहे. त्याच वेळी, राम गोपाल वर्मा यांनी त्याला मस्त चित्रपटात अभिनेता म्हणून संधी दिली. या चित्रपटाद्वारे त्याला बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली. त्याच्या हिट चित्रपटांमध्ये मस्ती (तिन्ही भाग), आवारा पागल दीवाना आणि हंगामा सारखे चित्रपट समाविष्ट आहेत.
