AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jasmin Bhasin: ‘मी माझ्या मर्यादा कधीच ओलांडल्या…’, इंटिमेट सीनवर जास्मिन भसीनचा मोठा खुलासा

Jasmin Bhasin On Intimate Scenes: आई - वडिलांचा उल्लेख करत जास्मिन हिने इंटिमेट सीनवर केलं मोठं वक्तव्य; अभिनेत्री म्हणाली, 'मी माझ्या मर्यादा ओलांडल्या...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा...

Jasmin Bhasin: 'मी माझ्या मर्यादा कधीच ओलांडल्या...', इंटिमेट सीनवर जास्मिन भसीनचा मोठा खुलासा
| Updated on: Aug 29, 2024 | 3:44 PM
Share

Jasmin Bhasin On Intimate Scenes: टीव्ही विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री जास्मिन भसीन कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. जास्मिन आता मालिकांमध्ये नाही तर, सिनेमामध्ये अधिक सक्रिय असते. पंजाबी सिनेविश्वात जास्मिन भसीन हिचं नाव फार मोठं आहे. पंजाबी सिनेविश्वाला अभिनेत्रीने अनेक हीट सिनेमे देखील दिले आहेत. आता अभिनेत्री ओटीटी प्लॅटफॉर्म येण्याची तयारी करत आहे. अभिनेत्रीच्या अटी पूर्ण झाल्यानंतर जास्मिन ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील दिसेल. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री इंटिमेट सीनवर मोठं वक्तव्य केलं आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीत जास्मिन हिला इंटिमेट सीनबद्दल विचार आलं. यावर अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्या अटी पूर्ण होणार नाहीत, तोपर्यंत मी ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार नाही… माझ्या अटी पूर्ण झाल्यानंतर मी ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करेल आणि दमदार अभिनय करेल…’ असं अभिनेत्री म्हणाली.

पुढे जास्मिन म्हणाली, ‘माझ्या काही मर्यादा आहेत आणि मला त्या ओलांडायच्या नाही. ओटीटीवर मला काहीतरी दमदार करायचं आहे. पण त्यासाठी मला माझी मर्यादा ओलांडायची नाही. मला असं काही करायचं आहे जे पाहिल्यानंतर माझ्या आई – वडिलांना लाज वाटणार नाही. ते मला स्क्रिनवर पाहत असतील तर, त्यांना मला सहज पाहता यायला हवं… मला असं वाटतं आपल्या भूमिकांबद्दल आपल्याला काळजी घ्यायला हवी…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

जास्मिन हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ‘बिग बॉस’नंतर जास्मिन अभिनेता अली गोनी याला डेट करत आहे. दोघांच्या नात्याला अनेक वर्ष झाली आहे. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे. शिवाय सोशल मीडियावर देखील दोघे एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करत असतात.

चाहते अली गोनी आणि जास्मिन यांना लग्नाबद्दल देखील विचारत असतात. सांगायचं झालं तर, जास्मिन सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा