Disha Patani | ‘ये लडकी है या आग’, दिशा पाटनीचा जबरदस्त स्टंट सोशल मीडियावर चर्चेत, पाहा व्हिडीओ…

दिशा पाटनीने तिच्या इंस्टाग्राम वॉलवर एक जबरदस्त व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती मार्शल आर्टचे करताना दिसत आहे. तिच्या या व्हिडीओचे चाहत्यांनी भरपूर कौतुक केले आहे.

Disha Patani | ‘ये लडकी है या आग’, दिशा पाटनीचा जबरदस्त स्टंट सोशल मीडियावर चर्चेत, पाहा व्हिडीओ...
दिशा पाटनी

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीच्या सौंदर्याचे लाखो लोक दिवाने आहेत. परंतु, तिच्या सौंदर्यापेक्षाही आजकाल तिची फिटनेस आणि स्टंटची चर्चा अधिक आहे. दिशा पाटनी (Disha Patani) सोशल मीडियावर आपल्या फिटनेसमुळे चर्चेत आली आहे, आता पुन्हा एकदा तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे, त्यातील जबरदस्त स्टंट पाहून लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. या व्हिडीओमध्ये दिशा पाटनी अतिशय कठीण स्टंट करताना दिसत आहे (Bollywood actress Disha Patani Share double round house kick stunt).

दिशाची डबल राऊंड हॉस किक

दिशा पाटनीने तिच्या इंस्टाग्राम वॉलवर एक जबरदस्त व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती मार्शल आर्टचे करताना दिसत आहे. तिच्या या व्हिडीओचे चाहत्यांनी भरपूर कौतुक केले आहे. या व्हिडीओत दिशाने अतिशय कठीण अशी डबल राऊंड किक मारून दाखवली आहे.

पाहा दिशाचा जबरदस्त स्टंट

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक दिशाचे तोंडभरून कौतुक करत आहेत. या पोस्टवरील एका कमेंटमध्ये एका वापरकर्त्याने दिशाचे कौतुक करताना लिहिले की, ‘ये लडकी है या आग’, तर दुसर्‍याने ‘वंडर वूमन’, असे लिहिले आहे. तर, कुणी ‘सो कूल’ लिहून तिच्या फिटनेसचे कौतुक केले आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 8 लाखाहून अधिक व्हुव्ज मिळाले आहेत.

दिशाने कोणाचे मानले आभार?

व्हिडीओ क्लिप शेअर करताना दिशाने कॅप्शनमध्ये तिच्या प्रशिक्षकाचे आभार मानले आहेत. व्हिडीओसह तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘महिला दिनाच्या शुभेच्छा. मला मजबूत बनवल्याबद्दल राकेश यादव यांचे आभार!’ (Bollywood actress Disha Patani Share double round house kick stunt).

‘या’ चित्रपटांमध्ये झळकणार दिशा

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, अभिनेत्री दिशा पाटनी सलमान खानसोबत ‘राधेः युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटात झळकणार आहे. ‘भारत’ नंतर दुसऱ्यांदा या चित्रपटात ती सलमानसोबत दिसणार आहे. हा चित्रपट यंदा म्हणजेच 2021मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभू देवा यांनी केले आहे.

दिशा लवकरच तिच्या पुढच्या ‘एक व्हिलन 2’ चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात करणार आहे. मोहित सूरी हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. 2020 मध्ये आलेल्या ‘मलंग’ चित्रपटात तिने मोहित सूरीबरोबर काम केले होते. याशिवाय एकता कपूर निर्मित चित्रपटासह दिशाकडे आणखीही अनेक चित्रपट आहेत. ज्यात दिशा पाटनी अक्षय ओबेरॉय आणि सनी सिंगसोबत दिसणार आहे.

(Bollywood actress Disha Patani Share double roundhouse kick stunt)

हेही वाचा :

Tarini | तारिणीच्या ‘त्या’ 6 धाडसी महिलांची कथा रुपेरी पडद्यावर, केंद्रीय मंत्र्याची लेक झळकणार मुख्य भूमिकेत!

Sanjay Leela Bhansali | संजय लीला भन्साळींना कोरोनाची लागण, ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रीकरण-प्रदर्शन पुन्हा लांबणीवर! 

Published On - 5:09 pm, Tue, 9 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI