Fashion Tips | दिशा पाटनीने सोशल मीडियावर शेअर केला ग्लॅमरस लूक, तुम्हीही ट्राय करू शकता ‘हा’ मेकअप!

Fashion Tips | दिशा पाटनीने सोशल मीडियावर शेअर केला ग्लॅमरस लूक, तुम्हीही ट्राय करू शकता ‘हा’ मेकअप!
दिशा पाटनी

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी  सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. ती दररोज सोशल मीडियावर आपले फोटो ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

Harshada Bhirvandekar

|

Feb 09, 2021 | 10:28 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी  सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. ती दररोज सोशल मीडियावर आपले फोटो ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिचे इंस्टाग्राम अकाऊंट ग्लॅमरस फोटोंनी भरलेले आहे. अलीकडेच दिशाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आणखी एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे (Bollywood Actress Disha Patani shares glamours look on social media).

या फोटोत दिशा एका वेगळ्याच मूडमध्ये दिसत आहे. या चित्रात दिशा पाटनी ब्लॅक ड्रेसमध्ये दिसली आहे. आपला मेकअप लूक दाखवण्यासाठी तिने हा फोटो शोषल मीडियावर शेअर केला आहे. तिचा हा मेकअप तिच्या चेहऱ्याचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.

या फोटोत दिशाने तिचे सौंदर्य आणखी खुलून दिसण्यासाठी एक सुंदर नेक पीस आणि इअर पीस कॅरी केला आहे. दिशा या सुंदर दागिन्यांमध्ये आणखी चमकत आहे. एमराल्ड ग्रीन रंगाच्या दागिन्यांमध्ये दिशा खूपच सुंदर दिसत आहे.

(Bollywood Actress Disha Patani shares glamours look on social media)

ग्लॅमरस मेकअप

तिच्या ज्वेलरीच्या लूकशी आपला मेकअप जुळण्यासाठी दिशाने तिच्या डोळ्यावर ग्रीन कलरच्या आय शेडो लावला आहे. याशिवाय आपला लूक पूर्ण करण्यासाठी दिशाने न्यूड लिपस्टिक परिधान केली आहे. तसेच, तिने आपले केस मोकळे ठेवले आहेत, ज्यामुळे तिचा लूक आणखी ग्लॅमरस बनत आहे (Bollywood Actress Disha Patani shares glamours look on social media).

लवकरच झळकणार मोठ्या चित्रपटांत!

दिशाचा हा फोटो लोकांना फार आवडला आहे. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, दिशा लवकरच सलमान खानसमवेत ‘राधे’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात सलमान-दिशासह रणदीप हूडा देखील दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवा यांनी केले आहे. ईदच्या निमित्ताने हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

दिशा लवकरच तिच्या पुढच्या ‘एक व्हिलन 2’ चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात करणार आहे. मोहित सूरी हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. 2020 मध्ये आलेल्या ‘मलंग’ चित्रपटात तिने मोहित सूरीबरोबर काम केले होते. याशिवाय एकता कपूर निर्मित चित्रपटासह दिशाकडे आणखीही अनेक चित्रपट आहेत. ज्यात दिशा पाटनी अक्षय ओबेरॉय आणि सनी सिंगसोबत दिसणार आहे.

(Bollywood Actress Disha Patani shares glamours look on social media)

हेही वाचा :

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें