Divya Chouksey Dies | “मी मृत्यूशय्येवर” इन्स्टाग्राम पोस्टनंतर काही तासात बॉलिवूड अभिनेत्री दिव्या चौकसेचे निधन

'है अपना दिल तो आवारा' चित्रपटातून दिव्याने 2016 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

Divya Chouksey Dies | मी मृत्यूशय्येवर इन्स्टाग्राम पोस्टनंतर काही तासात बॉलिवूड अभिनेत्री दिव्या चौकसेचे निधन
अनिश बेंद्रे

|

Jul 13, 2020 | 11:23 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दिव्या चौकसे हिने वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. कर्करोगावरील उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. आपले मरण सुकर व्हावे, यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन चाहत्यांना सोशल मीडियावरुन केल्यानंतर अवघ्या काही तासातच तिने अखेरचा श्वास घेतला. (Bollywood Actress Divya Chouksey Dies of Cancer)

दिव्याची चुलत बहीण सौम्या वर्मा आणि ‘कुंडली भाग्य’ मालिकेतील अभिनेत्री अंजुम फकीह यांनी दिव्याला श्रद्धांजली वाहिली. त्यामुळे दिव्याच्या निधनाची दु:खद वार्ता चाहत्यांना समजली. ‘है अपना दिल तो आवारा’ चित्रपटातून दिव्याने 2016 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

दिव्या चौकसे हिने आपल्या करिअरची सुरुवात ‘एमटीव्ही मेकिंग’ आणि ‘एमटीव्ही ट्रू लाइफ’ सारख्या मालिकांतून केली होती. तिने ‘मिस इंडिया यूके’मध्ये दुसर्‍या क्रमांकाचे उपविजेतेपद मिळवले होते. दिव्याने 2018 मध्ये गायिका म्हणून ‘पटियाले दी क्वीन’ हा स्वतःचा सोलो अल्बमही प्रदर्शित केला होता.

हेही वाचा : Ranjan Sehgal Died | ‘सरबजीत’ फेम अभिनेता रंजन सहगल याचे निधन

“दिव्याने लंडनमधून अ‍ॅक्टिंगचा कोर्स केला आहे. ती खूप चांगली मॉडेलही होती. तिने बर्‍याच चित्रपट आणि मालिकांमध्येही काम केले. गायन क्षेत्रातही तिने नाव कमावले. आणि आज ती आम्हाला सोडून निघून गेली. तिच्या आत्म्याला शांती लाभो” अशा भावना दिव्याची चुलत बहीण सौम्या वर्मा हिने फेसबुकवर व्यक्त केल्या आहेत.

दिव्याची अखेरची इन्स्टाग्राम स्टोरी

आपले मरण सुकर व्हावे, यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन दिव्याने चाहत्यांना अखेरच्या वेळी सोशल मीडियावरुन केले होते. “मला जे म्हणायचे आहे, ते शब्दात व्यक्त करु शकत नाहीत. पण एका महिन्यापासून मला बरेच मेसेजेस येत असल्यामुळे मला हे सांगण्याची वेळ आली की मी मृत्यूशय्येवर आहे. वाईट गोष्टी होतच राहतात. पण मी खूप सामर्थ्यवान आहे. पुढील जन्म कोणत्याही त्रासाविना मिळू दे. कृपया प्रश्न विचारु नका. मी तुमच्या सर्वांवर किती प्रेम करते, हे फक्त माझ्या देवाला माहित आहे.” असे तिने लिहिले होते

‘है अपना दिल तो आवारा’ चित्रपटातील सहकलाकार साहिल नंदा यानेही तिच्या आठवणींना उजाळा दिला.


(Bollywood Actress Divya Chouksey Dies of Cancer)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें