AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

53 वर्षीय लोकप्रिय अभिनेत्रीचा पहिला नवरा 18 वर्ष मोठा तर, दुसरा 7 वर्ष लहान… तिला मुलं किती?

झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांचं 18 - 20 वयात लग्न झालं. लहान वयात लग्न झाल्यामुळे अभिनेत्रींच्या आयुष्यात अनेक अडचणी देखील आहे... एका अभिनेत्रीने तर पहिलं लग्न स्वतःपेक्षा 18 वर्ष मोठ्या पुरुषासोबत केलं आणि दुसरं 7 वर्ष लहान अभिनेत्यासोबत केलं... तर जाणून घ्या अभिनेत्रीच्या खाजगी आयुष्याबद्दल...

53 वर्षीय लोकप्रिय अभिनेत्रीचा पहिला नवरा 18 वर्ष मोठा तर, दुसरा 7 वर्ष लहान... तिला  मुलं किती?
Tannaz Irani
| Updated on: Apr 08, 2026 | 12:45 PM
Share

सेलिब्रिटींचं आयुष्य दिसतं तसं नसतं… सेलिब्रिटींचं आयुष्य आपल्याला चमकदार आणि ग्लॅमरस दिसतं. पण सर्वच सेलिब्रिटींचं आयुष्य सर्वांना दिसतं तसं नसते… त्यांच्या आयुष्यात प्रचंड वेदना, संघर्ष आणि कठीण क्षण असतात. असंच आयुष्य एका प्रसिद्ध अभिनेत्रीचं देखील आहे. वयाच्या 18 व्या वर्षी अभिनेत्रीचं लग्न झालं आणि लग्नाच्या 2 वर्षांनंतर अभिनेत्री आई देखील झाली. वयाच्या 20 व्य वर्षी आई होणं… समाजाचा विरोध आणि घटस्फोटाच्या वेदना, त्यानंतर पुन्हा दुसरं लग्न… अभिनेत्रीने तिच्या आयुष्यात अनेक चढ – उतार पाहिले आहे. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री तनाज ईराणी आहे.

18 व्या वर्षी लग्न आणि 20 व्या झाली आई…

तनाझ ईराणी आज तीन मुलांची आई आहे… पण फिटनेसमध्ये अभिनेत्रीच्या पुढे आजच्या अव्वल अभिनेत्री देखील फेल आहे… तनाझ हिने वयाच्या 18 व्या वर्षी 18 वर्ष मोठ्या फरीद करीम याच्यासोबत लग्न केलं. लग्नाच्या दोन वर्षांनंतर अभिनेत्रीने लेकीला जन्म दिला… या लग्नाला तिच्या पारशी समाजातूनच मोठा विरोध झाला. समाजाने तिला वाळीत टाकलं, पण तनाझने प्रेमासाठी सर्वकाही सहन केलं. दुर्दैवाने, हे लग्न फार काळ टिकलं नाही आणि तिला घटस्फोटाचं दुःख सहन करावं लागलं.

घटस्फोटानंतर स्वतःचं आयुष्य पुन्हा पटरीवर आणण्यासाठी तनाझ हिने पुन्हा अभिनय विश्वात पदार्पण केलं.. 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कहो ना प्यार हैं’ सिनेमातून अभिनेत्रीने करियरची सुरुवात केली. सिनेमात अभिनेत्रीने अमिषा पटेल हिची बहीण ‘नीता’ या भूमिकेला न्याय दिला…

त्यानंतर अभिनेत्रीने मागे वळून पाहिलं नाही. ‘हमारा दिल आपके पास है’, ‘36 चाइना टाउन’, ‘हद कर दी आपने’ आणि ‘मैं प्रेम की दीवानी हूं’ या सिनेमांमध्ये देखील अभिनेत्री मुख्य भूमिका साकारताना दिसली… फक्त टीव्हीच नाही तर, अभिनेत्रीने अनेक मालिकांमध्ये देखील काम केलं आहे.

तनाझ हिच्या खसागी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, पहिल्या घटस्फोटानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात पुन्हा नव्या प्रेमाची एन्ट्री झाली… ‘गुरुकुल’ शोच्या शुटिंग दरम्यान, अभिनेत्रीची ओळक अभिनेता बख्तियार ईराणी सोबत झाली. आणि ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं… दोघांमध्ये 8 वर्षांचं अंतर असून देखील त्यांनी लग्न केलं. अभिनेत्याच्या कुटुंबियांनी आधी लग्नासाठी नकार दिला. पण नंतर सर्वकाही सुरुळीत सुरु झालं..

अखेर 2007 मध्ये बख्तियार आणि तनाझ यांचं लग्न झालं. दुसऱ्या लग्नानंतर अभिनेत्रीने आणखी दोन मुलांना जन्म दिला… आज अभिनेत्री दुसऱ्या नवऱ्यासोबत आनंदाने आयुष्य जगत आहे… गेल्या काही दिवसांपासून तनाज अभिनयापासून दूर आहे… पण आजही ती कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...