AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्याने माझ्या पँटमध्ये हात घातला…’, अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा

एका प्रसिद्ध अभिनेत्रीने नुकताच एका मुलाखतीमध्ये खळबळजनक खुलासा केला आहे. तिने सांगितलेला अनुभव ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.

'त्याने माझ्या पँटमध्ये हात घातला...', अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा
Gautami KapoorImage Credit source: Social Media
| Updated on: May 05, 2025 | 4:51 PM
Share

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना अभिनेत्रींना अनेक वाईट अनुभव येतात. तर कधी कधी अभिनेत्रींना त्यांच्या खासगी आयुष्यात देखील अनेक विचित्र घटनांना सामोरे जावे लागते. नुकताच एका अभिनेत्रीने तिला आलेला वाईट अनुभव सांगितला आहे. एका व्यक्तीने तिच्या पँटीमध्ये हात घातल्याचे सांगितले आहे. आता नेमकं काय घडलं होतं चला जाणून घेऊया…

नेमकं काय घडलं

अभिनेत्री गौतमी कपूरला शाळेत शिकत असताना एक वाईट अनुभव आला होता. तिने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, शाळेचा गणवेश घालून बसमधून घरी परतत असताना ही घटना घडली. ती म्हणाली, “मी सहावीत होते, शाळेतून घरी परतत होते. एका माणसाने माझ्या पँटच्या आत हात घातला.” या अनुभवाने ती पूर्णपणे हादरून गेली होती. घरी पोहोचल्यानंतर तिने ही घटना आपल्या आईला सांगितली. तिच्या आईने तिला धैर्याने अशा प्रसंगांना सामोरे जाण्याचा सल्ला दिला. गौतमी यांनी सांगितले, “माझी आई मला म्हणाली, ‘तू वेडी आहेस का? तू त्याला थोबाडीत मारायला हवी होती किंवा त्याची कॉलर पकडायला हवी होती.’ तिने मला कधीही घाबरू नको, असे सांगितले.” वाचा: लहानपणी आई-वडिलांचे निधन, आश्रमात मोठी झाली अभिनेत्री; मुंबईत दिग्दर्शकासोबत वाईट अनुभव

आईचा सल्ला आणि धडा

गौतमीच्या आईने तिला अशा परिस्थितीत स्वतःचा बचाव कसा करावा, याबद्दल मार्गदर्शन केले. ती म्हणाली, “तिने मला सांगितले की, जर कोणी असे काही करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा हात घट्ट पकडायचा, मोठ्याने ओरडायचे आणि घाबरायचे नाही. जर तुला भीती वाटत असेल तर रेड चिली स्प्रे जवळ ठेव आणि त्यांच्या चेहऱ्यावर मार. किंवा बूट काढून त्यांना मार. तुला काही होणार नाही.” या सल्ल्याने गौतमीला भविष्यात अशा परिस्थितींना सामोरे जाण्याचे बळ मिळाले.

बालपणीपासूनच प्रवास

गौतमीने हेही उघड केले की, तिच्या कुटुंबाकडे गाडी नव्हती, त्यामुळे तिला वयाच्या पाचव्या वर्षापासूनच बसमधून प्रवास करावा लागला होता. कॉलेजच्या काळातही ती बसमधूनच प्रवास करायची. तिने सांगितले की, त्या काळात तिला ट्रेनने प्रवास करणेही सुरक्षित वाटायचे. मात्र, ही घटना तिच्या आयुष्यातील एक वेदनादायक आठवण बनून राहिली आहे.

गौतमीच्या कामाविषयी

गौतमी कपूरने अनेक लोकप्रिय मालिकांमधून आपली ओळख निर्माण केली आहे. तिने ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’, ‘कसम से’, आणि ‘बडे अच्छे लगते हैं’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. अलीकडेच ती ‘ग्यारह ग्यारह’ या सीरिजमध्ये दिसली होती, जी कोरियन ड्रामा ‘सिग्नल’चे भारतीय रूपांतर आहे. गौतमी यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.

Follow Us
मोठी बातमी! ओमराजेंबाबात मी... ठाकरे असं म्हणाले? धाराशिवमधील
मोठी बातमी! ओमराजेंबाबात मी... ठाकरेंच्या विधानाने सगळेच अवाक्; धाराशिवमधील नगरसेवकांच्या बैठकीत असं काय घडलं?
दिल्लीत सीएनजी पंपावर भीषण स्फोट, रिफिलिंग दरम्यान मोठी दुर्घटना
दिल्लीत सीएनजी पंपावर भीषण स्फोट, रिफिलिंग दरम्यान मोठी दुर्घटना
अभिजीत दीपकेंची सर्वात मोठी मागणी! थेट म्हणाले, PM कॅअर फंडमधील 8,452
अभिजीत दीपकेंची सर्वात मोठी मागणी! थेट म्हणाले, PM कॅअर फंडमधील 8,452 कोटी रुपये... नेमकं काय घडलं?
अभिजीत दीपके नंतर आता रामदास आठवलेंचं या नेत्याला मोठं आवाहन;
अभिजीत दीपके नंतर आता रामदास आठवलेंचं या नेत्याला मोठं आवाहन; रिपब्लिकन पक्षात विलीन होण्याची मागणी
आवडत्या शिक्षकाच्या बदलीने चिमुकल्यांचे डोळे पाणावले; पालकांसह ठिय्या,
आवडत्या शिक्षकाच्या बदलीने चिमुकल्यांचे डोळे पाणावले; पालकांसह ठिय्या, शाळेत न जाण्याचा इशारा
ओमराजेंच्या जवळच्या नेत्याचं सुचक विधान; शिवसेना पक्ष सुनावणीबाबत...
ओमराजेंच्या जवळच्या नेत्याचं सुचक विधान; शिवसेना पक्ष सुनावणीबाबत म्हणाले, बहुसंख्य लोकांची ओढ...
शिवसेनेचं धनुष्यबाण खरंच गोठणार? ठाकरे गटातील बड्या नेत्याच्या मागणीने
शिवसेनेचं धनुष्यबाण खरंच गोठणार? ठाकरे गटातील बड्या नेत्याच्या मागणीने मोठी खळबळ
बहुमतावेळी शिंदे शिवसेनेचे सदस्य... न्यायमुर्ती बागची यांची टिप्पणी
बहुमतावेळी शिंदे शिवसेनेचे सदस्य... न्यायमुर्ती बागची यांची महत्त्वाची टिप्पणी, सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी;
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी; सुनावणीत काय घडलं?
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं नाव, फुटीच्या वेळी पडद्याआड काय काय घडलं होतं?