AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जया बच्चन यांनी केला अत्यंत मोठा खुलासा, म्हणाल्या, अमिताभ बच्चन कधीच…

बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन या कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. जया बच्चन या त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. नात नव्या नवेली नंदा हिच्या शोमध्ये जया यांनी अनेक मोठे खुलासे केले आहेत. त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल देखील शोमध्ये बोलताना जया बच्चन या दिसल्या.

जया बच्चन यांनी केला अत्यंत मोठा खुलासा, म्हणाल्या, अमिताभ बच्चन कधीच...
Jaya Bachchan
| Updated on: Sep 11, 2024 | 11:45 AM
Share

बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन या कायमच चर्चेत असतात. जया बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. जया बच्चन या मोठ्या संपत्तीच्या मालक आहेत. जया बच्चन कायमच त्यांच्या बिनधास्त विधानांमुळे चर्चेत असतात. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याबद्दल सध्या विविध चर्चा या सातत्याने रंगताना दिसत आहेत. दोघांमधील वाद वाढला असल्याचे सांगितले जातंय. फक्त हेच नाही तर ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन घटस्फोट घेणार असल्याचे काही रिपोर्टमध्ये म्हटले आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाची अनेक कारणे सांगितले जात आहेत.

जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांची लव्ह स्टोरी अत्यंत खास आहे. जंजीर चित्रपटाच्यावेळी दोघांच्या नात्याची चर्चा आणि त्यानंतर यांनी लग्न देखील केले. जया बच्चन या अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम करत. मात्र, जया बच्चन यांचे क्रश कधीच अमिताभ बच्चन हे नव्हते. एक दुसराच अभिनेता जया बच्चन यांचे क्रश होता. याबद्दलचा खुलासा देखील जया बच्चन यांच्याकडून करण्यात आला.

जया बच्चन यांनी त्यांच्या क्रशबद्दल करण जोहर याच्या शोमध्ये खुलासा केला. हेमा मालिनी यांच्यासोबत करण जोहरच्या शोमध्ये जया बच्चन या आल्या होत्या. यावेळी त्यांनी थेट हेमा मालिनी यांच्यासमोरच म्हटले होते की, धर्मेंद्र हे माझे क्रश होते. अमिताभ बच्चन कधीच क्रश नव्हते. मी बसंतीचे पात्र करायला हवे होते, कारण मी त्यांच्यावर खूप म्हणजे खूप जास्त प्रेम करत.

जेंव्हा मी धर्मेंद्र यांना पहिल्यांदा भेटले, त्यावेळी त्यांची आणि माझी ओळख ही करून देण्यात आली होती. मी खूप जास्त घाबरले होते आणि मला कळत नव्हते की मी काय करू? धर्मेंद्र हे जबरदस्त दिसणारे व्यक्ती होते. पहिल्याच भेटीत मी त्यांच्या प्रेमात पडले. विशेष म्हणजे मला आजही आठवते की, त्यांनी त्यावेळी काय कपडे घातले होते.

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचे लग्न अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये झाले. अगदी जवळचे लोक लग्नात उपस्थित होते. अमिताभ बच्चन यांच्या वडिलांनी त्यांच्या पुस्तकामध्ये जया आणि अमिताभ बच्चन यांच्या लग्नाबद्दल खुलासा केला. शेजाऱ्यांना देखील माहिती नव्हते की, इथे लग्न आहे. अमिताभ बच्चन हे सध्या काैन बनेगा करोडपतीला होस्ट करत आहेत.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.