AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunjay Kapur Death : करिश्मा कपूरवर दु:खाचा डोंगर, पोलो खेळताना अचानक हार्ट अटॅकने पूर्व पतीचं निधन

Sunjay Kapur Death : बॉलिवूडमधून एक दु:खद बातमी समोर आली आहे. करिश्मा कपूरचा पूर्व पती संजय कपूरच निधन झालं आहे. हैराण करणारी बाब म्हणजे या दु:खद घटनेच्या काहीवेळ आधी संजय कपूरने अहमदाबाद विमान अपघातावर दु:ख व्यक्त करणारी X वर पोस्ट केली होती. हे टि्वट आता व्हायरल झालं आहे.

Sunjay Kapur Death :  करिश्मा कपूरवर दु:खाचा डोंगर, पोलो खेळताना अचानक हार्ट अटॅकने पूर्व पतीचं निधन
Sunjay Kapur Death
| Updated on: Jun 13, 2025 | 8:29 AM
Share

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती संजय कपूरच निधन झालं आहे. संजय कपूर 53 वर्षांचा होता. गुरुवारी रात्री त्याच्या मृत्यूची बातमी समोर आली. संजय कपूर सध्या UK मध्ये होता. पोलो खेळत असताना अचानक हार्ट अटॅक आल्याने त्याचं निधन झालं. संजय कपूर हॉर्स पोलो खेळत होता. त्याच दरम्यान त्याला हॉर्ट अटॅक आला. तो घोड्यावरुन खाली पडला. त्याला लगेच मेडिकल हेल्प देण्यात आली. पण त्याचे प्राण वाचवता आले नाहीत. ऑटो कंपोनेंट्स बनवणारी कंपनी सोना कॉमस्टारचा तो चेअरमन होता. हैराण करणारी बाब म्हणजे संजय कपूरने काही तासांपूर्वी अहमदाबाद प्लेन क्रॅशवर दु:ख व्यक्त केलं होतं.

गुरुवारी अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण केल्यानंतर काही मिनिटात कोसळलं. यात 242 प्रवाशी होते. यावर संजय कपूरने X वर पोस्ट करुन दु:ख व्यक्त केलं होतं. “अहमदाबादमध्ये एअर इंडियाच विमान क्रॅश ही भयानक घटना आहे. मी सर्व प्रभावित कुटुंबांसाठी प्रार्थन करतो. या कठीण काळात त्यांना हिम्मत मिळो” असं त्याने X वरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

लग्न जवळपास 13 वर्ष टिकलं

करिश्मा कपूर आणि संजय कपूरच लग्न वर्ष 2003 मध्ये झालं होतं. दोघांच लग्न जवळपास 13 वर्ष टिकलं. 2016 साली संजय आणि करिश्मा परस्परापासून विभक्त झाले. करिश्मापासून वेगळं झाल्यानंतर 2017 साली संजय कपूरने प्रिया सचदेवसोबत लग्न केलं. संजय कपूरच्या अचानक झालेल्या निधनाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. संजय कपूरने मृत्यूच्या काहीवेळ आधीच केलेलं टि्वट आता व्हायरल झालं आहे.

घटस्फोटानंतर दुसरं लग्न सुखाचा संसार

मागच्या 8 वर्षांपासून संजय आणि प्रियाचा संसार सुखात सुरु होता. पण नियतीच्या मनात काही वेगळच होतं. त्याने अचानक या जगाचा निरोप घेतला. संजय कपूर आणि प्रिया सचदेव यांना एक मुलगाही आहे. त्याचं नाव Azarias आहे. तो आता फक्त 7 वर्षांचा आहे. लग्नाच्या एक वर्षानंतर 2018 साली Azarias चा जन्म झाला. संजय कपूरपासून करिश्मा कपूरला दोन मुलं आहेत. त्यांना एक मुलगी आहे, तिचं नाव समायरा आणि मुलाच नाव कियान आहे.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.