AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजारपणाला कंटाळून बॉयफ्रेंडने सोडली साथ? शेवटच्या श्वासापर्यंत एकटी राहिलेल्या अभिनेत्रीचं निधन हृदयद्रावक

तिच्या आयुष्यात खरं प्रेम नव्हतंच? पैसा, प्रसिद्धी, 3 बॉयफ्रेंड पण कठीण वेळी एकटीच होती अभिनेत्री; शेवटच्या क्षणी बॉयफ्रेंडने देखील सोडली साथ... अभिनेत्रीचं निधन अत्यंत हृदयद्रावक

आजारपणाला कंटाळून बॉयफ्रेंडने सोडली साथ? शेवटच्या श्वासापर्यंत एकटी राहिलेल्या अभिनेत्रीचं निधन हृदयद्रावक
| Updated on: Mar 12, 2023 | 12:45 PM
Share

Bollywood Love story : बॉलिवूडमधील काही किस्से आजही चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. सेलिब्रिटींची भांडणं, मैत्री, प्रेम प्रकरणं… इत्यादी गोष्टी आजही चर्चेत असतात. बॉलिवूडमध्ये काही प्रेम प्रकरणं अशी होती, जी तुफान चर्चेत राहिली. पण त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. त्यानंतर सेलिब्रिटींनी प्रेमाचा त्याग करत आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. तर काही अभिनेत्री आजही सर्वकाही असून एकटं आयुष्य जगत आहेत. तर काही अभिनेत्रींच्या आयुष्यात खऱ्या प्रेमाची एन्ट्री कधी झालीच नाही. एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आजारपणाला कंटाळून बॉयफ्रेंडने साथ देखील सोडली. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून दिवंगत अभिनेत्री परवीन बाबी आहेत. परवीन बाबी यांच्या निधनाला आज अनेक वर्षे उलटून गेली. पण आजही त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याच्या चर्चा रंगलेल्या असतात.

परवीन बाबी यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्यानंतर त्यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. महत्त्वाचं म्हणजे महानायक अमिताभ बच्चम यांच्या ‘दिवार’ सिनेमात भूमिका साकरल्यानंतर परवीन बाबी यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. त्यानंतर परवीन बाबी यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. यशाच्या शिखरावर असताना परवीन बाबी यांच्या नावाची चर्चा अभिनेता डॅनी डँझोपा यांच्यासोबत होवू लागली.

पण अभिनेता डॅनी डँझोपा आणि परवीन बाबी यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. डॅनी डँझोपा यांच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर परवीन बाबी यांच्या आयुष्यात अभिनेते कबीर बोदी यांची ओळख झाली. कबीर मॉडर्न विचारांचे असल्यामुळं परवीनशी त्यांचं सुत अतिशय सहजपणे जुळलं.

परवीन बाबी आणि कबीर यांना एकमेकांचा सहवास दिवसागणिक वाढत होता. दोघे लिव्हइनमध्ये देखील राहिले. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. त्यानंतर परवीन बाबी यांचं नाव प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यासोबत जोडलं जावू लागलं. परवीन बाबी यांच्यासोबत रिलेशनशिप असताना महेश भट्ट विवाहित होते. हे देखील समोर आलं.

आयुष्यात आलेल्या चढ – उतारानंतर परवीन यांना महेश भट्ट यांची साथ मिळाली. परवीन बाबी, महेश भट्ट यांच्यावर जीवापाड प्रेम करत होत्या. पण महेश भट्ट यांची देखील साथ त्यांना मिळाली नाही. मिळालेल्या माहितीनूसार सतत मद्यपान, सिगरेट आणि वाईट सवयींमुळे त्यांचं मानसिक संतुलन ढासळलं. सिजोफ्रेनिया या गंभीर आजाराने परवीन बाबी यांना गाठलं.

सिजोफ्रेनिया या आजारासोबतच परवीन यांना मधुमेहचा देखील त्रास सुरु झाला. अखेर आजारपणामुळे महेश भट्ट यांनी परवीन यांची साथ सोडली आणि शेवटच्या क्षणापर्यंत परवीन बाबी एकट्या राहिल्या. परवीन बाबी यांचं निधन देखील अत्यंत हृदयद्रावक झालं.

परवीन बाबी यांच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली. परवीन बाबी यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी संशयास्पद अवस्थेत आढळला होता. जेव्हा सोसायटीच्या सुरक्षा रक्षकानं त्यांच्या घराबाहेर दोन दिवसांपूर्वीचं दूध आणि पेपर पाहिले तेव्हा पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर परवीन बाबी यांचं निधन झाल्याची बातमी चाहत्यांना मिळाला.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.