AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राणी मुखर्जीला दुसऱ्या बायकोचा लेबल… 1 – 2 नाही, इतक्या पुरुषांचे संसार उद्ध्वस्त करण्याचे आरोप, तिसऱ्याबद्दल जाणून व्हाल हैराण

अभिनेत्री राणी मुखर्जी आज तिच्या खासगी आयुष्यात आनंदी आहे. पण एक काळ असो होता जेव्हा राणी हिच्यावर अनेकांनी घर फोडणारी म्हणून आरोप केले. यामध्ये अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी आहे. तर जाणून घ्या कोणत्या कोणत्या सेलिब्रिटींसोबत राणी हिच्या नावाची चर्चा रंगलेली.

राणी मुखर्जीला दुसऱ्या बायकोचा लेबल...  1 - 2 नाही, इतक्या पुरुषांचे संसार उद्ध्वस्त करण्याचे आरोप, तिसऱ्याबद्दल जाणून व्हाल हैराण
| Updated on: Mar 21, 2026 | 3:13 PM
Share

‘राजा की आएगी बारात’, ‘कुछ कुछ होता है’, ‘मेहंदी’ ‘हैलो ब्रदर’, ‘कही प्यार न हो जाये’, ‘चलते चलते’, अशा अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावणारी अभिनेत्री राणी मुखर्जी आजही तिच्या अभिनयामुळे चर्चेत असते. एक काळ असा होता जेव्हा, सर्वत्र फक्त आणि फक्त राणी मुखर्जी हिची चर्चा असायची. आज राणी मोठ्या पडद्यावर पूर्वी प्रमाणे सक्रिय नसली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम सक्रिय असते. आज राणी हिचा वाढदिवस आहे, त्यामुळे जाणून घ्या राणी हिच्याबद्दल काही माहिती नसलेल्या गोष्टी… राणी कायम तिच्या अभिनेयामुळे आणि सौंदर्यामुळे चर्चेत राहिली. पण राणीच्या नावाची तुफान चर्चा रंगली जेव्हा राणीने 2014 साली गुपचूप लग्न केलं. पण लग्नाआधी देखील राखीचं अनेक अभिनेत्यांसोबत नाव जोडण्यात आलं. सांगायचं झालं तर, राणी हिच्यासोबत आदित्य चोप्रा याचं दुसरं लग्न आहे…

अशात राणी हिच्यावर अनेकांचे संसार मोडल्याचे आरोप आहेत. त्यामधील काही सेलिब्रिटी तर विवाहित होते… तर जाणून घ्या कोणत्या कोणत्या सेलिब्रिटींसोबत राणी हिच्या नावाची चर्चा रंगलेली…

अभिनेता आमिर खान : राणी आणि आमिर यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. दोघांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर देखील घेतलं… रिल लाईफ प्रमाणे त्यांची रियल लाईफमधील केमिस्ट्री देखील चाहत्यांना आवडू लागली. दोघांच्या नात्याची चर्चा देखील रंगू लागलेली… तेव्हा आमिर आणि पहिली पत्नी रीना यांच्यातील वाद देखील समोर आले. एवढंच नाहीतर, आमिर माझा क्रश असल्याचा राणीने कार्यक्रमात स्वीकार केला.

अभिनेता गोविंदा : सध्या गोविंदा त्याच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा राणी आणि गोविंदा यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं. तेव्हाच त्यांच्या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. पण गोविंदा तेव्हा विवाहित होता. दोघांच्या अफेअरची गोष्ट अभिनेत्याच्या घरी कळाल्यानंतर गोविंदाची पत्नी सुनीता यांना मोठा धक्का बसला. पण अखेर गोविंदाने प्रेम विसरून कुटुंबाला सर्वात जास्त महत्त्व दिलं. राणीच्या आईला देखील गोविंदासोबत लेकीचं असलेलं नातं मान्य नव्हतं.

अभिनेता अभिषेक बच्चन : अभिषेक बच्चन आणि राणी यांच्या नावाच्या देखील तुफान चर्चा रंगल्या. दोघांचा साखरपुडा झाल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला. दोघांच्या नात्याला अभिनेत्री जया बच्चन यांचा देखील होकार होता. पण काही कारणांमुळे दोघांचं लग्न होऊ शकलं नाही.

आदित्य चोप्रा : सांगायचं झालं तर, आदित्यने लहानपणीची मैत्रिण पायलसोबत पहिलं लग्न केलं होतं. पण आदित्यच्या आयुष्यात राणीची एन्ट्री झाली आणि आदित्यचे पत्नीसोबत वाद होवू लागले. त्यानंतर काही वर्षांनी दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता राणी आदित्यसोबत वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे.

पहिली पत्नी पायल हिला घटस्फोट दिल्यानंतर आदित्यने अनेक वर्ष अभिनेत्री राणी मुखर्जीला डेट केलं. त्यानंतर 21 एप्रिल 2014 मध्ये दोघांनी गुपचूप लग्न केलं. आदित्य आणि राणी यांना एक मुलगी देखील आहे. पण अद्यापही राणीने तिच्या लग्नाचे फोटो चाहत्यांना दाखवलेले नाहीत.

Follow Us
'रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे?
'रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे?.
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?.
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे.
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?.
भोंदूबाबाचे अनेक कारनामे उघड, काय म्हणताहेत मिरगावचे गावकरी ?
भोंदूबाबाचे अनेक कारनामे उघड, काय म्हणताहेत मिरगावचे गावकरी ?.
जे भोंदूबाबाला शरण गेले त्या सर्वांनीच राजीनामा द्यावा - यशोमती ठाकूर
जे भोंदूबाबाला शरण गेले त्या सर्वांनीच राजीनामा द्यावा - यशोमती ठाकूर.
भोंदूबाबा खरातचा पीए नीरज जाधव कोर्टात हजर होणार? आणखी बाहेर पडणार?
भोंदूबाबा खरातचा पीए नीरज जाधव कोर्टात हजर होणार? आणखी बाहेर पडणार?.
...तर तटकरे आणि प्रभृतींनी अजितदादांचा वारसा सांगू नये - सुषमा अंधारे
...तर तटकरे आणि प्रभृतींनी अजितदादांचा वारसा सांगू नये - सुषमा अंधारे.
'भोंदूबाबाचा ट्रायडंटवरुन मंत्र्यांना आदेश...,' संजय राऊत यांचा आरोप
'भोंदूबाबाचा ट्रायडंटवरुन मंत्र्यांना आदेश...,' संजय राऊत यांचा आरोप.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदी आता IPS नेमा, अंजली दमानिया यांची मागणी
महिला आयोगाच्या अध्यक्षपदी आता IPS नेमा, अंजली दमानिया यांची मागणी.