पतीच्या मृत्यूनंतरही रेखा कोणाच्या नावाचे कुंकू भांगात लावते, मोठा खुलासा, अखेर..
बॉलिवूड अभिनेत्री रेखा हिने मोठा काळ अभिनय क्षेत्रात गाजवला आहे. रेखाची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. रेखा नुकताच मुंबई विमानतळावर स्पॉट झाली होती. रेखाच्या खास लूकची जोरदार चर्चा देखील त्यावेळी रंगताना दिसली. रेखाचे कायमच फोटो व्हायरल होताना दिसतात.

बॉलिवूड अभिनेत्री रेखाने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. रेखा फक्त चित्रपटच नाही तर तिच्या खासगी आयुष्यामुळेही जोरदार चर्चेत राहिलेली आहे. रेखाच्या खासगी आयुष्याबद्दल विविध चर्चा या कायमच रंगलेल्या आहेत. रेखा आणि अमिताभ बच्चन यांचेही नाते कोणापासून लपलेले नाहीये. रेखा आणि अमिताभ बच्चन हे बरीच वर्ष रिलेशनमध्ये होते. मात्र, याची भनक जया यांना लागताच रेखा आणि अमिताभ बच्चन हे दूर गेले. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. हेच नाही तर रेखा आणि अमिताभ बच्चन यांचे अनेक किस्से आजही चर्चेत आहेत.
रेखा यांचे 1990 मध्ये मुकेश अग्रवाल यांच्यासोबत लग्न झाले. मात्र, लग्नाच्या काही दिवसांनंतर मुकेश अग्रवाल यांचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर आणि लग्न होण्याच्या अगोदरपासूनही रेखा भांगात कुंकू लावते आणि गळ्यात मंगळसूत्र देखील घालते. यावरून विविध चर्चा या कायमच रंगताना दिसतात. आताही रेखा या कायमच भांगात कुंकू लावताना दिसतात.
रेखाने एका मुलाखतीमध्ये म्हटले होते की, नीतू कपूर आणि ऋषि कपूर यांच्या लग्नामध्ये मी भांगात कुंकू आणि मंगळसूत्र घालून गेले होते. त्याचे कारण म्हणजे मी चित्रपटाच्या शूटिंगवरून थेट तिथेच पोहोचले होते. परत रेखाने याबद्दल खुलासा करत म्हटले होते की, मी ज्या शहरातून येते तिथे भांगामध्ये कुंकू लावणे एक फॅशन आहे.
कोणताही पुरस्कार सोहळा असू किंवा अजून काही प्रत्येक ठिकाणी जाताना रेखा या भांगात कुंकू लावूनच जाताना दिसतात. मात्र, नेमके कोणाच्या नावाचे कुंकू आपण लावतो याबद्दल कधीच रेखा यांनी खुलासा केला नाहीये. एकदा रेखा या अमिताभ बच्चन यांच्या बर्थडे पार्टीला न बोलावताच गेल्याचा देखील मोठा किस्सा आहे.
हेच नाही तर माीडियापासून लपून राहण्यासाठी चक्क पूर्ण पार्टी होऊपर्यंत बाथरूममध्ये लपून बसण्याची वेळ ही रेखा यांच्यावर आली होती. रेखा या अत्यंत मोठ्या संपत्तीच्या मालकीन आहेत. मात्र, त्या आता एकटेपणाचे जीवन जगतात. रेखा आणि अमिताभ बच्चन यांची जोडी त्यावेळी सर्वात डीट जोडीपैकीं एक ठरली होती.
