AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंबानीच्या लग्नात पोहोचले सोनाक्षी सिन्हा हिचे दोन्ही भाऊ, ‘ते’ फोटो बघताच लोक भडकले, अखेर…

अनंत अंबानी याच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. आता सोनाक्षी सिन्हा हिचे दोन्ही भाऊ अनंत अंबानी याच्या लग्नात पोहोचले आहेत. काही दिवसांपूर्वीच सोनाक्षी सिन्हा हिचे देखील लग्न झाले. तिच्याही लग्नातील फोटो व्हायरल होताना दिसले.

अंबानीच्या लग्नात पोहोचले सोनाक्षी सिन्हा हिचे दोन्ही भाऊ, 'ते' फोटो बघताच लोक भडकले, अखेर...
Sonakshi Sinha brother
| Updated on: Jul 13, 2024 | 3:05 PM
Share

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न नुकताच झाले. या लग्नाचे नियोजन गेल्या काही महिन्यांपासून सुरू होते. विशेष म्हणजे जोरदार तयारी या लग्नाची करण्यात आली. देशच नाहीतर विदेशातूनही लोक या लग्नात सहभागी होण्यासाठी मुंबईत दाखल झाले होते. आता या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे प्री वेडिंग फंक्शनही जोरदार पद्धतीने साजरे करण्यात आले. बॉलिवूड कलाकार तर या लग्नामध्ये वरातीच बनले होते. कोणी स्टेजवर डान्स करताना दिसले तर कोणी चक्क अनंतच्या वरातीमध्ये डान्स करताना दिसले.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी पूनम सिन्हा आणि दोन्ही मुले लव आणि कुश हे देखील पोहोचले. काही दिवसांपूर्वीच सोनाक्षी सिन्हा हिचे देखील लग्न झाले. मात्र, लव आणि कुश हे सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नात दिसले नाहीत. त्यांनी बहिणीच्या लग्नात पाठ फिरवली. मात्र, दुसरीकडे अनंतच्या लग्नात दोन्ही भाऊ दाखल झाले.

लव आणि कुश आईसोबत पोहोचले. विशेष म्हणजे फोटोसाठी खास पोझ देतानाही लव आणि कुश दिसले. आता लव आणि कुशचे फोटो व्हायरल होत असताना अनेकांनी म्हटले की, बहीण सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नात न येणार अंबानींच्या लग्नात कसे काय दाखल झाले? लोक हे फोटो पाहून हैराण झाल्याचे देखील बघायला मिळतंय.

सोनाक्षी सिन्हा हिने 23 जून रोजी झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. मात्र, तिच्या लग्नात दोन्ही भाऊ उपस्थित नव्हते. सुरूवातीपासूनच सांगितले जात होते की, सोनाक्षी आणि झहीर यांच्या लग्नाला सिन्हा कुटुंबियांचा विरोध आहे. लग्नात सही करत असताना सोनाक्षी सिन्हा हिच्या शेजारी तिचे आई वडील दिसले.

हेच नाहीतर सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नानंतर चक्क तिच्या सासऱ्यांच्या विरोधात एक पोस्ट सोशल मीडियावर भाऊ लव याने शेअर केली होती. ती पोस्ट पाहून विविध चर्चा या रंगल्या होत्या. मात्र, अगदी काही वेळातच लवने ती पोस्ट डिलीट केली. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी तब्बल 7 वर्षे एकमेकांना डेट केले आणि मग लग्न करण्याचा निर्णय घेतला. सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

Follow Us
मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान...
Sanjay Raut : मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान, राऊतांच्या दाव्याने खळबळ
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजप...
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजपलाही टाकलं मागे!
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला