करिश्मा कपूर आणि रवीना टंडन यांच्यात जोरदार हाणामारी, ‘या’ अभिनेत्यांना करावी लागली मध्यस्थी, थेट…
बॉलिवूडच्या अभिनेत्रींमधील वाद कायमच चर्चेत असतात. मात्र, काही अभिनेत्रींमध्ये इतके जास्त वाद होतात की, त्या एकमेकींचे साधे तोंड देखील बघत नाहीत. बऱ्याच वेळा चित्रपटाच्या सेटवरही भांडणे करतात. करिश्मा कपूर आणि रवीना टंडन याच्यामध्येही अत्यंत मोठा वाद झाला आणि हा वाद टोकाला गेला.

बॉलिवूडच्या अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत, ज्यांच्यामध्ये इतके वाद झाले आहेत की, त्या एकमेकांचे तोंड देखील बघत नाहीत. हेच नाही तर चित्रपटाच्या सेटवरही भांडणे करताना दिसतात. अशावेळी चित्रपट निर्माते आणि अभिनेते मध्यस्थी करत अभिनेत्रींची भांडणे सोडवतात. अभिनेत्री रवीना टंडन आणि करिश्मा कपूर यांच्यातही जोरदार वाद झालेला आहे. हेच नाही तर यांचा वाद मिटवण्यासाठी चक्क आमिर खान आणि सलमान खान यांनी या दोघींनाही झाडाला बांधून टाकले. फराह खान यांनी करिश्मा कपूर आणि रवीना टंडन यांची थेट पोलखोलच केलीये. फराह खानचे हे बोलणे ऐकून लोकही हैराण झाल्याचे बघायला मिळतंय.
फराह खानने म्हटले की, मी करिश्मा कपूर आणि रवीना टंडन यांच्या आतिश चित्रपटातील गाणे करत होते. त्यावेळी दोघींमध्ये मोठा वाद सुरू होता. हेच नाही तर ही भांडणे इतकी जास्त वेगळी होती की, दोघी एकमेकींच्या अंगावर विविध वस्तू फेकून मारत होत्या, दोघी मारहाण करत होत्या. यांची अशाप्रकारची भांडणे पाहून मला स्वत:लाच धक्का बसला होता.
आता या भांडणांचा विचार करून दोघीही हसत असतील, असेही फराह खानने म्हटले आहे. यांचे हे भांडण सपना अपना अपना चित्रपटापर्यंत सुरू होते. दोघीही डायरेक्टर राजकुमार संतोषी यांच्या संपर्कात होत्या आणि चित्रपट मिळण्यासाठी प्रयत्न करत होत्या. मात्र, चित्रपटाच्या सेटवरील सर्वचण या दोघींच्या भांडणाला वैतागले होते.
शेवटी सलमान खान आणि आमिर खान यांनी दोघींना एका झाडाला बांधले आणि भांडणे मिटवण्यास सांगितले. या भांडणांबद्दल काही दिवसांपूर्वीच रवीना टंडन हिने भाष्य केले होते. रवीना टंडन म्हणाली की, त्यावेळी सोशल मीडियावर तर नव्हता की, त्याबद्दल आपण काही माहिती द्यावी. आता किती वेळा त्याबद्दलच बोलणार आणि उत्तर देत बसणार.
काही दिवसांपूर्वीच रवीना टंडन हिचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. विशेष म्हणजे रवीना टंडनचे हे व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओ मुंबईमधील आहेत. यामध्ये रवीना टंडन ही मला मारून नका असे म्हणताना दिसत आहे. हेच नाही तर दारू पिऊन गाडी चालवत असल्याचा गंभीर आरोपही रवीना टंडन हिच्यावर करण्यात आला होता. हे प्रकरण थेट पोलिसांपर्यंत जाऊन पोहोचले होते.
