Happy New Year 2021 : अक्षयपासून सारा अली खानपर्यंत, ‘नववर्षाची धडक, सेलिब्रेशन कडक’

बॉलिवूड सेलिब्रिटींनी 2021 चे मोठ्या उत्साहाने स्वागत केले आहे.

Happy New Year 2021 : अक्षयपासून सारा अली खानपर्यंत, 'नववर्षाची धडक, सेलिब्रेशन कडक'

मुंबई : बॉलिवूड सेलिब्रिटींनी 2021 चे मोठ्या उत्साहाने स्वागत केले आहे. एकीकडे, बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटी आपल्या कुटुंबियांसह आणि मित्रांसह नवीन वर्ष साजरे करण्यासाठी दुसऱ्या देशात गेले आहेत तर काहीजण देशातील वेगवेगळ्या ठिकाणी पोहचे होते. तर दुसरीकडे काही जणांनी घरातल्यांसोबतच नवीन वर्षाचे स्वागत केले. अमिताभ बच्चनपासून (Amitabh Bachchan) सारा अली खानपर्यंत (Sara Ali Khan) बॉलिवूड स्टारने नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात केले. (Bollywood celebrities warmly welcome 2021 and wish fans on social media)

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांच्या नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनची काही फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहेत. फोटो शेअर करताना प्रत्येकाने त्यांच्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ते एकदम मस्त लूकमध्ये दिसत आहेत. त्यामध्ये त्यांनी स्टाइलिश चष्मा आणि डोक्यावर टोपी घातलेली दिसत आहे. हा फोटो शेअर करताना अमिताभ यांनी चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

ऐश्वर्या बच्चन (Aishwarya Bachchan) हिने देखील कुटुंबासोबत 2021 चे स्वागत केले. तिने एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये अमिताभ आपल्या कूल लूकमध्ये असून जया बच्चन, अभिषेक बच्चन आणि आराध्या बच्चन फोटोमध्ये दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

सारा अली खानने (Sara Ali Khan) आपला भाऊ इब्राहिमसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले ” भावासोबत नवीन वर्ष साजरे करणे नेहमीच मजेदार आहे. तो माझा सर्व भीती दूर करतो”

 

View this post on Instagram

 

A post shared by Twinkle Khanna (@twinklerkhanna)

ट्विंकल खन्नाने (Twinkle Khanna) तिच्या इंस्टाग्रामवर तिचा आणि अभिनेता अक्षय कुमारसोबतचा (Akshay Kumar) फोटो शेअर केला असून तिच्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

संबंधित बातम्या : 

नव वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी शिल्पा शेट्टी कुटुंबासह गोव्यात, सुट्टींचा आनंद लुटण्यात मग्न

(Bollywood celebrities warmly welcome 2021 and wish fans on social media)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI