AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Urmila Matondkar : दिग्दर्शकाच्या बायकोने कानशिलात लगावताच उद्ध्वस्त झालं उर्मिलाचं आयुष्य, पूर्व पतीने थाटला दुसरा संसार

'रंगीला गर्ल'ला एका चुकीची मोजावी लागली मोठी किंमत, दिग्दर्शकाच्या बायकोने सर्वांसमोर लगावली कानशिलात कारण... आता पर्व पतीने देखील थाटला दुसरा संसार... एकटीच राहिली उर्मिला मातोंडकर

Urmila Matondkar : दिग्दर्शकाच्या बायकोने कानशिलात लगावताच उद्ध्वस्त झालं उर्मिलाचं आयुष्य, पूर्व पतीने थाटला दुसरा संसार
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर
| Updated on: Jun 17, 2026 | 2:57 PM
Share

Urmila Matondkar : बॉलिवूडची रंगीला गर्ल म्हणजे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आज तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे अनेक चर्चेत आली आहे. नुकताच उर्मिला हिच्या पूर्व पतीने दुसरं लग्न केलं. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील तुफान व्हायरल झाले. मोहसिन अख्तर मीर याने दुसरं लग्न केल्यानंतर उर्मिला हिच्या खासगी आयुष्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. एक काळ असा होता जेव्हा उर्मिला हिच्यासोबत काम करण्यासाठी दिग्दर्शक आणि निर्मात्यांची रांग लागलेली असायची. पण उर्मिला हिने सर्वांसोबत काम करण्यास नकार दिला. अखेर याची मोठी किंमत अभिनेत्रीला मोजवी लागली…

बॉलिवूडमध्ये सक्रिय असताना उर्मिला हिचं नाव दिग्दर्शक राम गोपाल वर्मा याच्यासोबत जोडलं जात होतं. पण दोघांचं नातं कधीच लग्नापर्यंत पोहोचलं नाही. सांगायचं झालं तर, दोघांच्या नात्याची सुरुवात, ‘द्रोही’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान झाली. वर्मा यांनी अभिनेत्रीचा डान्स पाहिला आणि तिच्या प्रेमात पडले. अखेर ‘रंगीला’ सिनेमासाठी दिग्दर्शकाने उर्मिला हिची निवड केली. रामगोपाल वर्मा यांनी त्यांच्या अनेक सिनेमांमध्ये उर्मिला हिला संधी दिल्या. तेव्हा अन्य दिग्दर्शकांसोबत काम करण्यास अभिनेत्री सतत नकार देत होती…

पण दोघांच्या नात्यात मोठा ट्विस्ट आला, जेव्हा राम गोपाल वर्मा यांच्या पत्नीला सर्वकाही कळलं. उर्मिला हिच्यासोबत नवऱ्याचे प्रेमसंबंध आहेत कळताच त्यांच्या पत्नीने अभिनेत्रच्या कानशिलात लगावली आणि रामगोपाल वर्मा यांना घटस्फोट दिला. त्यानंतर रामगोपल वर्मा आणि उर्मिला यांच्या नात्याला देखील तडा गेली.

राम गोपाल वर्मा यांच्या सिनेमात उर्मिला हिला काम मिळणं देखील बंद झालं. अशात दुसऱ्या कोणत्या दिग्दर्शकाने उर्मिला हिच्यासोबत काम करण्यास पुढाकार घेतला नाही. कारण प्रसिद्धीझोतात असताना अभिनेत्रीने सर्व दिग्दर्शकांना नकार दिलेला. अशात उर्मिला हिची लोकप्रियता कमी होऊ लागली.. अखेर उर्मिला हिने मोहसिन अख्तर मीर याच्यासोबत लग्न केलं. वयाच्या 42 व्या वर्षी उर्मिला हिने लग्न केलं होतं.पण दोघांचं लग्न देखील फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वी मोहसिन याने दुसरं लग्न केलं आणि उर्मिला आज एकटीच आयुष्य जगत आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा