AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Govinda : ‘राइज अँड फॉल 2’ मध्ये गोविंदाची एंट्री ? होस्ट बनणार की स्पर्धक .. मोठी अपडेट समोर

बॉलिवूड अभिनेता गोविंदा याची नवी इनिंग सुरू होत असून तो लवकरच ‘राइज अँड फॉल 2’ दिसू शकतो. शोच्या मेकर्ससोबत त्याची चर्चा सुरू आहे. पण तो हा शो होस्ट करणार की स्पर्धक म्हणून होणार सहभागी ?

Govinda :  ‘राइज अँड फॉल 2’ मध्ये गोविंदाची एंट्री ? होस्ट बनणार की स्पर्धक .. मोठी अपडेट समोर
Govinda in Reality show
| Updated on: Sep 01, 2026 | 3:44 PM
Share

Govinda In Rise And Fall Season 2 : 90 च्या दशकातील सुपरस्टार, हीरो नंबर- 1 आणि 120 पेक्षाही अधिक चित्रपटांमध्ये काम केलेला स्टार म्हणजेच गोविंदा (Govinda) . गेल्या बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर असलेल्या गोविंद आता सेकंड इनिंगसाठी सज्ज झाला असून लवकरच तो चित्रपटात झळकणार आहे. मात्र त्याचप्रमाणे तो एका रिॲलिटी शोमध्येही झळकू शकतो अशी चर्चा आहे. खरंतर, गोविंदाचे चाहते बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यावर त्यांच्या कमबॅकची वाट पाहत आहेत. चाहत्यांना त्यांना पुन्हा एकदा चित्रपटांमध्ये पाहायचे आहे. गोविंदादेखील ‘रूपा’ आणि ‘दुनियादारी’ यांसारख्या चित्रपटांमधून कमबॅक करण्याची तयारी करत आहे. मात्र, आता त्याला ‘राइज एंड फॉल’ या रिॲलिटी शोसाठी ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मेकर्सशी त्याची चर्चाही सुरू असल्याचं समजतं.

‘राइज एंड फॉल’मध्ये होस्ट बनणार की स्पर्धक ?

‘राइज एंड फॉल’चा पहिला सीझन गेल्या वर्षी, 2025 मध्ये मध्ये आला होता. हा शो MX Player वर स्ट्रीम करण्यात आला होता. भारतपेचे सह-संस्थापक अशनीर ग्रोवर यांनी या शोचं होस्टिंग सूत्रसंचालन केलं होतं. आता निर्माते या रिअॅलिटी शोचा दुसरा सीझन आणण्याच्या तयारीत आहेत. ‘व्हरायटी इंडिया’च्या एका रिपोर्टनुसार, गोविंदाला या शोची ऑफर देण्यात आली असून त्याच्यासोबतची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मात्र तो होस्ट म्हणुन नव्हे तर स्पर्धक म्हणून दिसू शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार, या शोमध्ये सहभागी होण्यासाठी गोविंदाही खूप उत्सुक असल्याचं सांगितलं जात आहे.

याआधी केलं होतं रिॲलिटी शोचं सूत्रसंचालन

जर गोविंदा आणि शोच्या निर्मात्यांमधील चर्चा यशस्वी झाली, तर तो या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होऊ शकतो. मात्र, गोविंदा हा काही पहिल्यांदाच एखाद्या रिॲलिटी शोमध्ये सहभागी होत नाहीये. यापूर्वी तो ‘जीतो छप्पर फाड के’ या सोनी टीव्हीवरील गेम शो मध्ये दिसला होता. पण त्या शोमध्ये त्याने सूत्रसंचालकाची भूमिका पार पाडली होती. त्यामुळे ‘राइज एंड फॉल’मध्ये त्याची एंट्री झाली, तर स्पर्धक म्हणून हा त्याचं रिॲलिटी शोमधलं दार्पण असेल.

गोविंदा गेल्या 7 वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रंगीला राजा’ या चित्रपटात तो शेवटचा दिसला होता. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी करू शकला नाही आणि तो मोठ्या प्रमाणात फ्लॉप ठरला. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाच्या निर्मितीसाठी निर्मात्यांनी सुमारे 19 कोटी रुपये खर्च केले होते. मात्र, चित्रपटाची कमाई 1 कोटीही झाली नाही. जगभरातील बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने केवळ 40 लाख रुपयांचा ग्रॉस कलेक्शन केल्याचं सांगितलं जातं.

Follow Us
बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला...
Mumbai Hospital | बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला? व्हिडीओ व्हायरल; प्रशासन म्हणतं, रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न...
देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? हाकेंचा थेट सवाल
Laxman Hake | देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? लक्ष्मण हाकेंचा थेट सवाल; ओबीसी आरक्षणावरून घमासान
महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?
Supriya Sule | महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?; सुप्रिया सुळे यांचा सरकारला थेट सवाल
ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा
Uday Samant | ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीचे संकेत
मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना
Cabinet Meeting Update | मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपूर्वी मोठी खलबतं!
सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील...
Subhash Chandra | सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील NCLTचा आदेश रद्द
भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना...
PM Modi | भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना म्हणाले, निराशा पसरवू नका...
ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
OBC Morcha | ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात आंदोलक आक्रमक; मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम!
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम! 75 वर्षीय आजींच्या धैर्याची कहाणी थक्क करणारी
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत....
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत सर्वच महागलं