Bollywood Movies In April | कोरोना लॉकडाऊनचं सावट, तरीही बॉक्स ऑफिसवर नशीब आजमवणार ‘हे’ बॉलिवूड चित्रपट…

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यात थिएटरमध्ये चित्रपट प्रदर्शित करणे निर्मात्यांसाठी एक आव्हानच असणार आहे. तरीही एप्रिलमध्ये अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ आणि कंगना रनौतचा ‘थलायवी’, तसेच काही ओटीटीवरील चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहेत.

Bollywood Movies In April | कोरोना लॉकडाऊनचं सावट, तरीही बॉक्स ऑफिसवर नशीब आजमवणार ‘हे’ बॉलिवूड चित्रपट...
बॉलीवूड चित्रपट

मुंबई : कोरोना विषाणूचा कहर पुन्हा एकदा वाढला आहे. दिवसेंदिवस कोरोना केसेस वाढत चालल्या आहेत. पुन्हा एकदा चाहत्यांना कोरोनाचे भयंकर रूप पाहायला मिळते आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे मनोरंजन विश्वाची अवस्था खालावली आहे. बर्‍याच दिवसानंतर, आता कुठे चित्रपट पुन्हा एकदा पडद्यावर प्रदर्शित होऊ लागले होते, तर पुन्हा एकदा कोरोनाचे भयंकर रूप धारण करत निर्मात्यांची पाचावर धरण केली आहे. कोरोनाचे सावट असले तरी या एप्रिल महिन्यात अब्रेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपले नशीब आजमवण्यास तयार झाले आहेत (Bollywood Movies releasing  In April see list).

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यात थिएटरमध्ये चित्रपट प्रदर्शित करणे निर्मात्यांसाठी एक आव्हानच असणार आहे. तरीही एप्रिलमध्ये अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ आणि कंगना रनौतचा ‘थलायवी’, तसेच काही ओटीटीवरील चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहेत. या सर्व चित्रपटांची चाहत्यांना उतुकता आहे.

‘हे’ चित्रपट होणार प्रदर्शित

कोई जाने ना

सर्वप्रथम, ‘कोई जाने ना’ हा चित्रपट येत्या 2 एप्रिल रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. हा चित्रपट सस्पेन्स-थ्रिलरने भरलेला आहे. या चित्रपटात कुणाल कपूर आणि अमायरा दस्तूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटातील एका गाण्यात चाहत्यांनी यापूर्वी आमीर खानलाही पाहिले आहे.

फ्लाईट

‘फ्लाईट’ हा चित्रपट देखील या महिन्यात थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सूरज जोशी दिग्दर्शित या चित्रपटात मोहित चड्ढा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात पवन मल्होत्रा, झाकीर हुसेन हे कलाकार देखील दिसणार आहेत.

99 साँन्ग्स

‘99 साँन्ग्स’ हा चित्रपट 16 एप्रिल रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहेत. हा चित्रपट एक म्युझिक ड्रामा कथेवर आधारित आहे. या चित्रपटाची निर्मिती भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज संगीतकार ए.आर. रहमान यांनी केली आहे (Bollywood Movies releasing  In April see list).

थलायवी

यासह या महिन्यात सर्वांचे लक्ष लागून असलेला चित्रपट म्हणजे ‘थलायवी’ देखील प्रदर्शित होणार आहे. 23 एप्रिल रोजी कंगना रनौतचा चित्रपट ‘थलायवी’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट जयललिता यांचा बायोपिक आहे. हा चित्रपट थिएटरमध्येच प्रदर्शित होणार असल्याचे कंगनाने स्पष्ट केले आहे.

सूर्यवंशी

अक्षय कुमारचा एक वर्षापासून अडकलेला ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट 30 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. वर्षभरापूर्वी कोरोनामुळे हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला होता. हा चित्रपट 30 एप्रिलला प्रदर्शित होणार असला, तरी पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पाहून असे दिसते की, कदाचित चित्रपट पुढे ढकलला जाऊ शकतो.

ओटीटीवर मनोरंजनाची मेजवानी

एप्रिलमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक उत्तम चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. 8 एप्रिलला ‘बिग बुल’ हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टार व्हीआयपीवर प्रदर्शित होईल. हा चित्रपट हर्षद मेहता याच्या जीवनावर आधारित आहे. याशिवाय 9 एप्रिल रोजी ‘हॅलो चार्ली’ Amazon प्राइम व्हिडिओवर रिलीज होईल. या चित्रपटात अदर जैन, जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यासह 16 एप्रिल रोजी ‘रात बाकी है’ हा चित्रपट ‘झी 5’कार प्रदर्शित होईल, ज्यामध्ये अनुप सोनी, पाओली दाम, राहुल देव मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

(Bollywood Movies releasing  In April see list)

हेही वाचा :

Kirron Kher | ‘ती लढवय्यी आहे…लवकर बरी होईल’, अनुपम खेरकडून पत्नी किरणच्या तब्येतीची माहिती

Kirti Kulhari | ‘आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय…’, ‘उरी’ फेम अभिनेत्री होणार पतीपासून विभक्त!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI