अजय देवगन की बायको काजोल… कोण आहे सर्वात जास्त श्रीमंत? दोघांची टोटल नेटवर्थ थक्क करणारी

Ajay Devgn - Kajol Net Worth: किती आणि अजय देवगन आणि काजोल यांची संपत्ती, दोघांमध्ये कोण आहे सर्वात जास्त श्रीमंत? अभिनेता एक सिनेमा करून होतो मालामाल, तर कजोल..., गडगंज संपत्तीचे मालक आहेत अजय आणि काजोल

अजय देवगन की बायको काजोल... कोण आहे सर्वात जास्त श्रीमंत? दोघांची टोटल नेटवर्थ थक्क करणारी
Follow us
| Updated on: Aug 05, 2024 | 12:15 PM

अभिनेता अजय देवगन गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अजय याने पत्नी आणि अभिनेत्री काजोल हिच्यासोबत देखील अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. अजय देवगन याच्याबद्दल सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अभिनेत्याचं खरं नाव विशाल वीरू देवगन असं आहे. पण बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर अभिनेत्याने स्वतःचं नाव बदललं आणि अजय देवगन असं ठेवलं. 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फुल और कांटे’ सिनेमात अजय याला मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली आणि सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई देखील केली.

बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना अजय आणि कजोल एकमेकांच्या प्रेमात पडले. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अजय आणि काजोल यांनी लग्न केलं. 1999 मध्ये काजोल आणि अजय यांनी लग्न केलं. दोघांना एक मुलगी नीसा देवगन आणि मुलगा युग देवगन आहे… दोघांच्या लग्नाल 25 वर्ष असून अजय – काजोल कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतात.

काजल आणि अजय यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघांनी कधीच एकमेकांना प्रपोज केलं नाही. दोघांना एकमेकांचे विचार पटले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला… काजल आणि अजय यांनी ‘इश्क’, ‘प्यार तो होना ही था’, ‘यू मी और हम’ आणि ‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ ‘हलचल’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे.

हे सुद्धा वाचा

अजय देवगन याची नेटवर्थ

बॉलिवूडचा ‘सिंघम’ एका सिनेमासाठी जवळपास 60 कोटी रुपये घेता. रिपोर्टनुसार, अजय याची नेटवर्थ 540 कोटी रुपये आहे. अजय आज कुटुंबासोबत रॉयल आयुष्य जगत आहे. मुंबईत अभिनेत्याचा आलिशान बंगला देखील आहे. ज्यामध्ये अजय त्याच्या कुटुंबसोबत राहातो. अजय याला महागड्या गाड्यांचा देखील शोक आहे. अभिनेत्याच्या गॅरेजमध्ये अनेक महागड्या गाड्या आहेत.

काजोलची नेटवर्थ…

काजोल फक्त सिनेमांच्या माध्यमातून नाही तर, जाहिराती, रिऍलिटी शो, सोशल मीडिया,कार्यक्रमांच्या माध्यमातून कोट्यवधींची कमाई करते. कोजालचा स्वतःचा एक मेकअप ब्रँड देखील आहे. काजोल एका जाहिरातीसाठी जवळपास 3 कोटी रुपये घेते. स्टेज शोसाठी अभिनेत्री 2 – 3 कोटी रुपये घेते. अभिनेत्रीच्या नेटवर्थबद्दल सांगायचं झालं तर, काजोल हिच्याकडे 250 कोटी रुपयांची संपत्ती आहे. आज काजोल – अजय बॉलिवूडचे पॉव्हर कपल म्हणून ओळखले जातात.

'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला
'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला.
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?.
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO.
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?.
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले.
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब.
भुजबळांनी दिलेल्या चॅलेंजवर जरांगे यांचा पलटवार; म्हणाले, १ लाख काय...
भुजबळांनी दिलेल्या चॅलेंजवर जरांगे यांचा पलटवार; म्हणाले, १ लाख काय....
त्यांनीच माझा भाजप प्रवेश रोखला; खडसेंनी घेतली 'या' दोन नेत्यांची नावं
त्यांनीच माझा भाजप प्रवेश रोखला; खडसेंनी घेतली 'या' दोन नेत्यांची नावं.
शिवरायांचं राज्य तेव्हा किती होतं?, मोहन भागवत यांनी काय दिला दाखला?
शिवरायांचं राज्य तेव्हा किती होतं?, मोहन भागवत यांनी काय दिला दाखला?.
सोमय्या सक्रिय होणार, विधानसभेच्या तोंडावर पक्षाकडून मोठी जबाबदारी
सोमय्या सक्रिय होणार, विधानसभेच्या तोंडावर पक्षाकडून मोठी जबाबदारी.