कॅन्सरमुळे आणखी एक अभिनेत्याने गमावला जीव, इंडस्ट्रीवर शोककळा
झगमगत्या विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्याचं निधन झालं आहे... कर्करोगामुळे अभिनेत्याचं निधन झालं आहे, ज्यामुळे इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे...

आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींचं कॅन्सरमुळे निधन झालं आहे. आता पुन्हा कॅन्सरने एका प्रसिद्ध अभिनेत्याचे प्राण घेतले आहेत. प्रसिद्ध तमिळ अभिनेता मदन बॉब यांचं निधन झालं आहे. 2 ऑगस्ट रोजी त्यांनी चेन्नई येथे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या कुटुंबाच्या जवळच्या सूत्रांनी सांगितल्या नुसार, शनिवारी त्यांचं आरोग्याच्या समस्यांमुळे निधन झाले. मदन बॉब यांनी कर्करोग होता ज्यामुळे ते बराच काळ रुग्णालयात दाखल होते.
मदन बॉब हे 71 वर्षांचे होते. ते कर्करोगाशी झुंज देत होते आणि त्यांनी अड्यार येथील त्यांच्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. मदन बॉब यांनी कमल हासन, रजनीकांत, अजित, सूर्या आणि विजय यांसारख्या आघाडीच्या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केली होती. अभिनेत्याच्या निधनामुळे इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.
एक उत्तम अभिनेता आणि संगीतकार
सन टीव्हीवरील लोकप्रिय कॉमेडी शो “असथा पोवाथु यारू” मध्ये ते जज म्हणून दिसले. ते एक बहुमुखी अभिनेते आणि संगीतकार होते. 1984 मध्ये बाळू महेंद्र यांच्या ‘नींगल केट्टावई’ या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी संगीतकार म्हणून चित्रपटसृष्टीत आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.
1980 मध्ये सुरु केलं करीयर
1980 मध्ये मदन बॉब यांनी करीयरला सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. मदन बॉब यांनी 1984 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धीरे-धीरे नींगल केट्टावई’ सिनेमात महत्त्वाची भूमिका बजावली, त्यानंतर ‘वानामे एलाई’, ‘वसूल राजा एमबीबीएस’ यांसारख्या हीट सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.
अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत केलीये स्क्रिन शेअर…
मदन बॉब यांनी रजनीकांत, कमल हासन, विजय, अजित आणि सूर्या सारख्या स्टार्ससोबत स्क्रीन स्पेस शेअर केली. त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील इंडस्ट्रीमध्ये मोठी आहे. सिनेमांशिवाय, त्याने सन टीव्हीच्या कॉमेडी रिअॅलिटी शो असाथा पोवाथु यारूमध्ये न्यायाधीश म्हणून लोकप्रियता मिळवली जिथे त्यांच्या विनोदी क्षणांमुळे ते पिढ्यानपिढ्या चाहत्यांचा मनात राहिले.
