बॉलिवूडच्या निशाण्यावर चंद्रमुखी देवी; उर्मिला, तापसी आणि पूजा भट्टकडून समाचार!

उत्तर प्रदेशमधील बदायूंमध्ये एका 50 वर्षांच्या महिलेवर अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे.

बॉलिवूडच्या निशाण्यावर चंद्रमुखी देवी; उर्मिला, तापसी आणि पूजा भट्टकडून समाचार!

लखनऊ : उत्तर प्रदेशमधील बदायूंमध्ये एका 50 वर्षांच्या महिलेवर अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. मानवतेला लाज वाटले अशी ही घटना आहे आणि विशेष म्हणजे उत्तर प्रदेशमधील हि दुसरी घटना आहे. यामुळे उत्तर प्रदेशमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. पीडित महिलेच्या घरी गुरुवारी राष्ट्रीय महिला सदस्य चंद्रमुखी देवी (Chandramukhi devi) पोहचल्या होत्या त्यावेळी त्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. यादरम्यान त्यांनी या महिलेची विचारपूस केली. मात्र, त्यानंतर त्यांनी अतिशय धक्कादायक विधान केले. (Bollywood targeted National Women Member Chandramukhi Devi’s statement)

त्यांचे म्हणणे आहे की, ही पीडित महिला जर संध्याकाळी घराबाहेर पडली नसती तर ही घटना घडली नसती. चंद्रमुखी देवीच्या या विधानानंतर बॉलिवूड अभिनेत्रीनी संताप व्यक्त केला आहे. ट्विटरवर चंद्रमुखी देवी यांच्या या विधानाचा व्हिडिओ रिट्विट करताना तापसी पन्नूने (Taapsee Pannu) लिहिले की “जर देशात या मानसिकतेचे लोक नसते तर अशी घटना घडली नसती.”

तापसीच्या ट्विटनंतर उर्मिला मातोंडकरने (Urmila Matondkar)ट्विट केले की, ‘ही मानसिकता आतमधून बदलण्याची आवशक्ता आहे. तोपर्यंत काही बदल होण्याची शक्यता नाही आणि एक महिला दुसऱ्या महिलेला गुन्हेगार कसे म्हणू शकते. हे अतिशय खेदजनक आणि दुर्दैवी आहे.

Respected @NCWIndia @sharmarekha Do you stand by this statement by your representative in context to the Badaun rape case. Kindly clarify if you agree with your representative that the victim was at fault for stepping out to visit a temple unaccompanied and at the time she did. https://t.co/45OosCgLu5

— Pooja Bhatt (@PoojaB1972) January 7, 2021

महेश भट्ट यांची मुलगी पूजा भट्टनेही ट्विटरवर ट्वीट केले, आधी तिने ट्विटरवर रेखा शर्मा हे ट्विट टॅग केले, त्यानंतर तिने लिहिले की, तुम्ही पण यांच्या विधानाशी सहमत आहेत का? तुम्हालाही असेच वाटते का ती पीडित महिला चुकीच्या वेळी मंदिरात गेली होती. यावर रेखा शर्मा यांनी पूजाच्या या ट्विटला उत्तर देताना म्हटले आहे की, चंद्रमुखी देवी यांच्या विधानाशी मी सहमत नाही. कुठल्याही महिलेला तिला वाटेल त्यावेळी बाहेर जाण्याचा, फिरण्याचा हक्क आहे. महिलांच्या सुरक्षेची काळची घेणे हे समाज आणि राज्याचे कर्तव्य आहे.

संबंधित बातम्या : 

Farhan Akhtar | आईची धमकी आली कामी, पहिल्याच चित्रपटासाठी नॅशनल अवॉर्ड!

Fitness Goal | हृदयविकाराचा धक्काही रेमो डिसूझाला रोखू शकला नाही, पुन्हा एकदा कसरती सुरु!

(Bollywood targeted National Women Member Chandramukhi Devi’s statement)

Published On - 10:16 am, Sat, 9 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI