बॉलिवूडचा सर्वात दुर्दैवी सिनेमा; चित्रपटाला बनवायला 23 वर्ष,शुटींगदरम्यान 2 अभिनेते अन् दिग्दर्शकाचाही मृत्यू
बॉलिवूडचा असा एक चित्रपट जो सर्वात दुर्दैवी चित्रपट मानला जातो. कारण चित्रपट बनवेपर्यंत दो्न्ही अभिनेत्यांचा मृत्यू झाला, तसेच दिग्दर्शकाचाही मृत्यू झाला. हा कोणता चित्रपट आहे माहितीये?

बॉलिवूडमध्ये 70-80 च्या चित्रपटांची मजा काही औरच होती. तेव्हाच्या कथा, गाणी काही वेगळेच असायचं. जुन्या चित्रपटांपैकी काही चित्रपट तर आजही तेवढ्याच आवडीने पाहिले जातात. प्रत्येक चित्रपटाची एक कहाणी होती. असाच चित्रपट ज्याबद्दल आजही बोलताना दु:ख व्यक्त केलं जातं. या चित्रपटाला बनवण्यासाठी 23 वर्ष लागली. या चित्रपटाशी संबंधित अनेक दुःखद घटना घडल्या, ज्यामध्ये तीन मुख्य पात्रांचा मृत्यू झाला.
चित्रपटाचं शुटींग अनेकदा थांबलं
या चित्रपटाचं नाव आहे “लव्ह अँड गॉड” आहे. जो पूर्ण होण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ लागला. हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक के. आसिफ यांनी बनवला होता. हा चित्रपट लैला-मजनूच्या प्रेमकथेवर आधारित होता, ज्यामध्ये मजनूची भूमिका संजीव कुमार यांनी साकारली होती आणि लैलाची भूमिका निम्मीने साकारली होती. हा चित्रपट के. आसिफसाठी खास होता कारण तो त्यांचा पहिला रंगीत चित्रपट होता. चित्रपटाचे चित्रीकरण 1963 मध्ये सुरू झाले होते, परंतु काही कारणांमुळे हा चित्रपट मध्येच थांबवावा लागला. यानंतर, 1970 मध्ये पुन्हा चित्रीकरण सुरू झाले, परंतु नंतर पुन्हा थांबलं आणि अखेर 1968 मध्ये चित्रपट पूर्ण झाला.
- Bollywood Unluckiest Film,Love and God, 23 Years, 3 Deaths
अचानक तिघांचा मृत्यू
चित्रपटाची सुरुवात गुरु दत्त यांच्यापासून होणार होती, मात्र त्याच्या पुढच्याच वर्षीच त्यांचे निधन झाले, ज्यामुळे शूटिंग चार वर्षे थांबवण्यात आलं होतं. त्यानंतर 1970 मध्ये संजीव कुमार यांच्यासोबत पुन्हा शूटिंग सुरू झालं, पण 1971 मध्ये के. आसिफ, जे या चित्रपटाबद्दल खूप गंभीर होते, त्यांचही निधन झालं. त्यानंतर के. आसिफ यांच्या पत्नीने चित्रपट पूर्ण करण्याची जबाबदारी घेतली. परंतु चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच संजीव कुमार यांचेही निधन झाले. हा चित्रपट नेहमीच त्याच्या कथेपेक्षा त्याच्या कठीण प्रवासासाठी आणि दुःखद घटनांसाठी अधिक लक्षात ठेवला जातो.त्यामुळे या चित्रपटाला बॉलिवूडचा सर्वात दुर्दैवी सिनेमा म्हटलं जातं.
पण नंतर अखेर अनेक अडचणींनंतर हा चित्रपट पूर्ण करण्यात आला. एकंदरीत या चित्रपटाला पूर्ण होण्यासाठी 23 वर्ष लागली.
