कॅमेरासमोर लिप-लॉक,ते हातात हात घेत फोटो; बॉलिवूड स्टार्सचे रोमँटिक व्हॅलेंटाईन सेलिब्रेशन
14 फेब्रुवारीला सामान्यांप्रमाणेच बॉलिवूड सेलिब्रिटींनीही व्हॅलेंटाईन डे साजरा केला. सोनम कपूर ते शिल्पा शेट्टीपर्यंत अनेकांनी आपल्या नवऱ्यासोबतचे फोटो शेअर करत अगदी खास पद्धतीने हा प्रेमाचा दिवस साजरा केला आहे. प्रत्येकाने व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशनचे खास फोटो त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

काल म्हणजे 14 फेब्रुवारी 2025 रोजी सर्वत्र व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने हा प्रेमाचा दिवस साजरा केला. सामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटींनी त्यांच्या व्हॅलेंटाईन कसा साजरा केला याबद्दल नक्कीच चाहत्यांना आकर्षण असतं. शिल्पा शेट्टी पासून ते बिपाशा बासूपर्यंत सर्वांनी अगदी वेगवेगळ्या पद्धतीने हा प्रेमाचा दिवस साजरा केला.
बिपासा बासू
बॉलिवुड अभिनेत्री बिपाशा बासूने आपल्या इंस्टाग्रामवर आपला पती करण सिंह ग्रोवर सोबत अनेक फोटोज शेअर केले आहेत. या फोटोजमध्ये दोघांची लव्ह केमिस्ट्री दिसून येत आहे. दोघांनी मालदीव बीचवर आपला क्वालिटी टाइम घालवताना दिसत आहे. फोटोज मध्ये करण बिपाशाला प्रेमानं किस करताना दिसत आहे. तसेच बिपाशाने त्यांचे फोटो शेअर करत ‘मंकी लव, आय लव यू, मेरा मंकी, अभी और हमेशा, हर दिन, हर दिन और इससे भी ज्यादा। सभी को वैलेंटाइन डे की शुभकामनाए” असं कॅप्शनही तिने दिलं आहे.
View this post on Instagram
शिल्पा शेट्टी
शिल्पा शेट्टीनेगी आपल्या इंस्टाग्राम वेबसाइटवर आपला पती राज कुंद्रासोबत व्हॅलेंटाईन सेलिब्रेट केला आहे. तिने त्यांचे फोटो शेअर केले आहे. या फोटोंमध्ये दोघांचे बॉन्डिंग स्पष्ट दिसत आहे. फोटोमध्ये दोघेही हाताने हृदय बनवताना दिसत आहेत. या फोटोंमध्ये शिल्पा शेट्टी मनमोकळेपणाने हसताना दिसत आहे. तर शिल्पाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, बॉयफ्रेंड, व्हॅलेंटाईन, सौभाग्य कि हा माझा नवराही” असं कॅप्शन देत शिल्पाने नवऱ्यावरील प्रेम व्यक्त केलं आहे.
View this post on Instagram
सोनम कपूर
अभिनेत्री सोनम कपूरनेही सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती तिच्या पतीसोबत दिसत आहे. यातील एका फोटोमध्ये सोनम कपूर तिच्या पतीच्या गळ्यात हात टाकून उभी असलेली दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये तिच्या नवऱ्याने सोनमला उचलून घेतलेलं दिसत आहे. दरम्यान सोनमने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मी तुझ्यासाठी सदैव कृतज्ञ आहे, माझा सदैव क्रश जो बेड पकडून ब्लँकेट चोरतो. पण तरीही मी आजही तुझ्या ऑनलाइन शॉपिंगपेक्षा तुझ्यावर जास्त प्रेम करते.” असं गंमतीशीर कॅप्शन तिने दिलं आहे.
View this post on Instagram
सोहा अली खान
व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी सोहाने तिच्या पतीला खूप खास पद्धतीने शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळत आहेत. सोहाने कुणालसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी सोहाने तिचा पती कुणालवर मनापासून प्रेमाचा वर्षाव केला आहे. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सोहा आणि कुणाल कॅमेऱ्यासमोर लिप-लॉक करताना दिसत आहेत. दोघांचा हा फोटो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो शेअर करताना सोहाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘पुन्हा पुन्हा प्रेमात पडण्याची संधी.’ या जोडप्याच्या फोटोवर यूजर्सही प्रेमाचा वर्षाव करतानाही दिसत आहेत.
View this post on Instagram
