20 Years Of KKKG | करण जोहरच्या ‘कभी ख़ुशी कभी गम’ला 20 वर्ष पूर्ण! चित्रपटाबद्दलच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितीयेत का?

20 Years Of KKKG | करण जोहरच्या ‘कभी ख़ुशी कभी गम’ला 20 वर्ष पूर्ण! चित्रपटाबद्दलच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला माहितीयेत का?
Kabhi Khushi Kabhi Gham

तुम्ही जर बॉलिवूड चित्रपटांचे चाहते असाल, तर तुम्ही 'कभी खुशी कभी गम' (Kabhi Khushi Kabhi Gham) हा चित्रपट पाहिला नाही असे होऊच शकत नाही! करण जोहरच्या चित्रपटांमध्ये नेहमीच ड्रामा, इमोशन्स आणि प्रेम यांचा उत्तम मिलाफ पाहायला मिळतो.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Dec 14, 2021 | 10:45 AM

मुंबई : तुम्ही जर बॉलिवूड चित्रपटांचे चाहते असाल, तर तुम्ही ‘कभी खुशी कभी गम’ (Kabhi Khushi Kabhi Gham) हा चित्रपट पाहिला नाही असे होऊच शकत नाही! करण जोहरच्या चित्रपटांमध्ये नेहमीच ड्रामा, इमोशन्स आणि प्रेम यांचा उत्तम मिलाफ पाहायला मिळतो. या चित्रपटाने देखील त्याच्या या संकल्पनेला एक नवी उंची मिळवून दिली होती. हा चित्रपट अनेकांच्या आवडत्या ‘रविवार ट्रीट’पैकी एक होता. मात्र, करणच्या चित्रपटांमध्ये भावनांची अतिशयोक्ती दाखवली जाते हेही तितकेच खरे आहे. चित्रपटाचे मोठे सेट, महागडे कपडे, बडे स्टार्स एकंदरीत लार्जर दॅन लाईफ चित्रण कधी प्रेक्षकांना आवडते, तर कधी ते नाकारतात. मात्र, ‘कभी ख़ुशी कभी गम’ला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले. या चित्रपटाने आज 20 वर्ष पूर्ण केली आहेत.

करणच्या ‘कभी ख़ुशी कभी गम’ या चित्रपटात कुटुंब, प्रेम आणि त्यांच्यातील वाद, यासह काही आयकॉनिक सीन देखील आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. पण, तरीही या चित्रपटाशी संबंधित अशा काही गोष्टी आहेत, ज्या कदाचित तुम्हाला माहीतही नसतील. चला तर या खास निमित्ताने जाणून घेऊया अशाच काही गोष्टी…

‘यु आर माय सोनिया..’तून जोडीच बदलली!

‘कह दो ना, कह दो ना, यु आर माझी सोनिया’ या गाण्यात सुरुवातीला शाहरुख आणि काजोलची जोडीही या गाण्याचा भाग असणार होती. हा एक सिक्वेन्स जॅझ नंबर असणार होता. पण, नंतर हा सीन चित्रपटातून काढून टाकण्यात आला. नंतर हे गाणं हृतिक आणि करीनावर चित्रित झाले.

जॉन अब्राहमने नाकारला चित्रपट!

अभिनेता जॉन अब्राहम हे आज बॉलिवूडमधलं एक मोठं नाव आहे. पण, बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख आणि मोठे नाव बनवण्यासाठी जॉनने बराच काळ वाट पाहिली आहे. आज तो जिथे आहे तिथे पोहोचण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. ज्यावेळी हा चित्रपट बनत होता, त्यावेळी जॉन इंडस्ट्रीत अगदीच नवखा होता आणि या चित्रपटात करीना कपूरचा कॉलेजमधील मित्र रॉबीची भूमिका जॉन अब्राहमला ऑफर झाली होती. पण, जॉनने ही भूमिका नाकारली. नंतर जॉन अब्राहम करण जोहरच्या ‘दोस्ताना’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसला होता.

मेकिंगवर बनले पुस्तक!

करण जोहरच्या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रेम आणि प्रशंसा मिळाली. इतकेच नाही तर हा असा पहिलाच चित्रपट आहे, जो तयार करण्याच्या प्रक्रियेवर पुस्तक लिहिले गेले आणि ते प्रकाशितही झाले.

सेटवरच बेशुद्ध झाला करण जोहर

‘बोले चुडिया’ गाण्याच्या शूटिंगदरम्यान करण जोहर इतका तणावाखाली होता की, डिहायड्रेशनमुळे तो सेटवरच बेशुद्ध पडला होता. नंतर तो दिवसभर बेडवर झोपून त्याच्या वॉकीटॉकीसह उर्वरित गाण्याच्या सूचना देत होता.

20 वर्षानंतर एकत्र दिसले अमिताभ-जया

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा 1981मध्ये आलेला ‘सिलसिला’ हा शेवटचा चित्रपट होता, ज्यामध्ये हे रिअल लाइफ कपल रील लाईफमध्ये एकत्र दिसले होते. त्यानंतरच्या वादामुळे ते पुन्हा एकत्र दिसले नव्हते. मात्र, 20 वर्षांनंतर करण जोहरच्या या बिग बजेट फॅमिली ड्रामाद्वारे त्यांनी रुपेरी पडद्यावर जबरदस्त पुनरागमन केले.

हेही वाचा :

Vicky-Ankita Wedding | ‘आज मेरे यार की शादी है..’ अंकिता लोखंडे-विकी जैनच्या संगीत सोहळ्याला कंगनाने लावले चार चांद!

Happy Birthday Rana Daggubati | फोटोग्राफीचे व्यवसायिक शिक्षण, अभिनयच नव्हे ‘या’ क्षेत्रातही राणा दग्गुबाती अव्वल!

Happy Birthday Sameera Reddy | आई झाल्यानंतर नैराश्यात गेली, आता मनोरंजन विश्वापासून दूर राहतेय समीरा रेड्डी!


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें