Rashmika Mandanna : रश्मिकाला भेटण्यासाठी चाहत्याकडून 900 किलोमीटरचा प्रवास, सोशल मीडियावरुन दिली माहिती

रश्मिकाला भेटण्यासाठी तिचा चाहता तिच्या कर्नाटकच्या घरी पोहोचला होता मात्र चित्रपटाच्या शूटिंगमुळे रश्मिका सध्या कर्नाटकात नाहीये त्यामुळे ती या व्यक्तीला भेटू शकली नाही. (900 km journey from fan to meet Rashmika Mandana, Information given on social media)

Rashmika Mandanna : रश्मिकाला भेटण्यासाठी चाहत्याकडून 900 किलोमीटरचा प्रवास, सोशल मीडियावरुन दिली माहिती

मुंबई : नॅशनल क्रश रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सध्या चाहत्यांच्या मनावर राज्य करतेय. चाहत्यांना तिची प्रत्येक झलक आवडते. सोशल मीडियावरही ती खूप अ‍ॅक्टिव्ह आहे आणि ती तिच्या चाहत्यांसाठी सुंदर फोटो शेअर करत असते. चाहत्यांनाही तिचे हे फोटो प्रचंड आवडतात. आता तिला भेटण्यासाठी तिचा एक चाहता 900 किलोमीटरचा प्रवास करून तिच्या घरी पोहोचला होता. ही माहिती स्वत: रश्मिकानं सोशल मीडियावर दिली आहे.

कर्नाटकच्या घरी पोहोचला चाहता

रश्मिकाला भेटण्यासाठी तिचा चाहता तिच्या कर्नाटकच्या घरी पोहोचला होता मात्र चित्रपटाच्या शूटिंगमुळे रश्मिका सध्या कर्नाटकात नाहीये त्यामुळे ती या व्यक्तीला भेटू शकली नाही. मात्र ही माहिती मिळताच रश्मिकानं सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली.

पाहा रश्मिकाचं ट्विट

काय म्हणाली रश्मिका..

रश्मिकानं ट्विट केलं- मित्रांनो, मला हे समजलं की तुमच्यातील कोणीतरी लांब प्रवास करुन माझ्या घरी भेटायला गेले होते. कृपया असं काहीही करु नका. मला वाईट वाटतंय की मी तुला भेटू शकले नाही. मला आशा आहे की एक दिवस मी तुला नक्की भेटेल, मात्र तोपर्यंत इथेच प्रेम दाखवा. मला खूप आनंद होईल…

रश्मिकाच्या या चाहत्याचं नाव आहे…

रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर रश्मिकाच्या चाहत्याचं नाव त्रिपाठी आहे. तो तेलंगणाहून कर्नाटकातील कोडागुमध्ये रश्मिकाला भेटण्यासाठी गेला होता. त्यानं गूगल वरून रश्मिकाचा पत्ता काढला आणि स्थानिक लोकांच्या मदतीनं तिच्या घरापर्यंत पोहोचला. रश्मिकाच्या घराच्या भागात राहणाऱ्या काही लोकांनी त्वरित पोलिसांना कळविलं आणि त्या व्यक्तीला परत पाठवण्यात आलं आहे.

नॅशनल क्रशचा बॉलिवूडमध्ये डेब्यू…

दक्षिण सिनेमात धमाकेदार काम केल्यानंतर आता रश्मिका बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत मिशन मजनूमध्ये झळकणार आहे. रश्मिकानंही या चित्रपटाचं शूटिंग सुरू करण्याबाबत पोस्ट शेअर केली आहे.

संबंधित बातम्या

Ankita Lokhande : रियासोबत बिग बॉस प्रवेशाच्या चर्चा, अंकिता लोखंडे म्हणते…

‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाचं चित्रिकरण पूर्ण, आलिया भट्टची इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI