Lal Singh Chaddha | अखेर मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार!

काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की, अभिनेता आमिर खान (Aamir Khan) याचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'लाल सिंग चड्ढा' ची (Lal Sing Chaddha) रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. यामागे पोस्ट प्रोडक्शनचे काम अपूर्ण असल्याचे कारण देण्यात आले होते.

Lal Singh Chaddha | अखेर मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार!
Lal Singh Chaddha


मुंबई : काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की, अभिनेता आमिर खान (Aamir Khan) याचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’ ची (Lal Sing Chaddha) रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. यामागे पोस्ट प्रोडक्शनचे काम अपूर्ण असल्याचे कारण देण्यात आले होते. या चित्रपटात आमिरच्या व्यक्तिरेखेचा संपूर्ण जीवनप्रवास दाखवण्यात येणार असल्याचे बोलले जात होते. या कारणास्तव VFX वर विशेष लक्ष दिले जात आहे. आता त्याच्या निर्मात्यांनी एक नवीन पोस्टर शेअर केला असून, त्याची नवीन रिलीज डेट जाहीर केली आहे.

आमिर खान प्रॉडक्शनने भारतीय प्रेक्षकांना ‘लगान’, ‘तारे जमीन पर’, ‘दंगल’ आणि अनेक वर्षांमध्ये इतर अनेक सुपरहिट सिनेमी दिले आहेत.  तेच या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. ‘लाल सिंग चड्ढा’ची पुढील रिलीज तारीख 14 एप्रिल 2022 रोजी बैसाखीच्या दिवशी ठेवण्यात आली आहे. अतुल कुलकर्णी यांनी एरिक रॉथ यांनी लिहिलेल्या फॉरेस्ट गंप या सहा वेळा अकादमी पुरस्कार विजेत्या चित्रपटाचे भारतीय रूपांतर केले आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात आमिर खान आणि करीना कपूर खान मुख्य भूमिकेत आहेत. अद्वैत चंदन दिग्दर्शित या चित्रपटाला प्रीतमचे संगीत आणि अमिताभ भट्टाचार्य यांनी गीते दिली आहेत. हा चित्रपट वायाकॉम 18 स्टुडिओने सादर केला आहे.

पाहा पोस्टर :

‘गुरू नानक जयंती’निमित्त चाहत्यांना खास भेट म्हणून, आमिर खान प्रॉडक्शन आणि वायकॉम 18 स्टुडिओने ‘लाल सिंग चड्ढा’ ची रिलीज तारीख 14 एप्रिल 2022 रोजी एका नवीन पोस्टरसह जाहीर केली आहे. पोस्टरमध्ये आमिर खान आणि करीना कपूर खान यांच्यातील केमिस्ट्री दर्शवण्यात आली आहे, ज्यांनी ब्लॉकबस्टर 3 इडियट्समध्ये रोमँटिक जोडपे म्हणून एकत्र काम केले होते. भारतभर 100 हून अधिक ठिकाणी चित्रित केलेली ही प्रेमकथा नायकाच्या प्रवासाच्या वेगवेगळ्या कालखंडात प्रेक्षकांना घेऊन जाते. ‘लाल सिंग चड्ढा’ची निर्मिती आमिर खान, किरण राव आणि Viacom18 स्टुडिओज यांनी केली आहे आणि 14 एप्रिल 2022 रोजी बैसाखी रोजी जगभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होईल.

आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ 11 फेब्रुवारी 2022 रोजी रिलीज होणार होता. हा हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’चा अधिकृत रिमेक आहे. या चित्रपटात करीना कपूरही मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट अद्वैत चंदन दिग्दर्शित करत आहे. साऊथचा अभिनेता नागा चैतन्य या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

हेही वाचा :

Bhumi Pednekar | सुंदर, सोज्वळ भूमी पेडणेकरच्या दिलकश अदा पाहून चाहतेही झाले घायाळ! पाहा फोटो…

Tusshar Kapoor Net Worth : करोडोंच्या संपत्तीचा मालक तुषार कपूर, ऑडी-बीएमडब्ल्यू सारख्या वाहनांचाही शौकीन!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI